मसाप दक्षिण शाखेच्या कार्यक्रमाला शालेय विद्यार्थ्यांचा भरभरून प्रतिसाद
सोलापूर : ब्रिटीशांविरूध्द झालेल्या भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये बळ देणार्या वंदे मातरमचा इतिहास प्रेरक आहे, असे प्रतिपादन पत्रकार तथा युवा अभ्यासक सिध्दाराम पाटील यांनी केले. 
वंदे मातरम गीताच्या सार्ध शताब्दी निमित्त वंदे मातरम गीताचा लपलेला इतिहास या विषयावर महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूरच्या वतीने अॅम्फी थिएटर मध्ये आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. यावेळी सोलापूर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होती.
भारतीय स्वातंत्र्यासाठी 1857 मध्ये मोठे युद्ध झाले होते. त्याआधी 100 वर्षापुर्वी जवळपास 20 लाख भारतीयांनी सहभाग घेऊन ब्रिटीशांविरूध्द स्वातंत्र्याचा लढा उभा केला होता. त्या लढ्याचे घोषवाक्य होते, ओम वंदे मातरम. स्वातंत्र्यासाठी उभा राहिलेल्या लढ्यात प्रेरणा देणारे वंदे मातरम किती शक्तीशाली होते, याची प्रचिती आल्यानेच ब्रिटीश राजवटीतील भारतीय अधिकारी डेप्युटी मॅजिस्ट्रेट बंगाली कवी बंकीमचंद्र चटोपाध्याय यांनी 1875 मध्ये बंगाली भाषेत वंदे मातरम गीत लिहिले. त्यानंतर आनंदमठ या कादंबरीमध्ये त्याचा समावेश केला. 
थोर स्वातंत्र्य सेनानी कवी रविंद्रनाथ टागोर यांनी 1896 रोजी झालेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात सर्वप्रथम ही वंदे मातरम कविता सादर केली, 
तेव्हापासून स्वातंत्र्य लढ्याची प्रेरणा ठरलेल्या वंदे मातरम् ने देशात क्रांती केली आणि देश स्वातंत्र्य होण्यासाठी वंदे मातरम या गीताची प्रेरणा ठरली. 
नुकतेच वंदे मातरम या गीताला दीडशे वर्षे पूर्ण झाले. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतर भारताचे राष्ट्रीय गीत ठरलेल्या या वंदे मातरम चा लपलेला इतिहास काय आहे, याबाबत पत्रकार आणि युवा अभ्यासक सिध्दाराम पाटील आपल्या व्याख्यानातून सांगितले. 
आपल्या देशाचा वरवरचा आणि तात्पुरता इतिहासच आजच्या तरूणांना माहित आहे. असे न होता तरूणांनी आपल्या देशाच्या महान इतिहासाचा अभ्यास केला पाहिजे. ' आनंदमठ ' कादंबरीचे वाचन केले पाहिजे, असेही सिध्दाराम पाटील यांनी सांगितले.
प्रारंभी महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूरच्या अध्यक्षा रेणुका महागांवकर यांनी प्रास्ताविक केले. मसाप दक्षिण सोलापूर शाखेला नुकताच वैशिष्ट्यपूर्ण शाखा म्हणून राज्यस्तरीय पुरस्काराने गौरवण्यात आले. विविध आणि वैशिष्ट्यूपर्ण उपक्रम राबवण्याची परंपरा दक्षिण शाखेने सुरू ठेऊन आजचा वंदे मातरम् चा लपलेला इतिहास यावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले, असेही त्यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये सांगितले.
त्यानंतर प्रमुख पाहुणे तसेच वक्ते यांचा परिचय कोषाध्यक्ष अमोल धाबळे यांनी केले. वक्ते सिध्दाराम पाटील यांचा सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला त्यानंतर प्रमुख पाहुणे सोलापूर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा सत्कार दक्षिण सोलापूर शाखेचे प्रसिध्दीप्रमुख विनायक होटकर यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यवाह जितेश कुलकर्णी यांनी केले. 
या कार्यक्रमाला कार्याध्यक्ष प्रशांत बडवे, सल्लागार अविनाश महागांवकर, आमदार देवेंद्र कोठे, नगरसेवक सात्विक बडवे यांच्यासह सिध्देश्वर बँकेचे अध्यक्ष नरेंद्र गंभीरे, शिवसेनेचे महेश धाराशिवकर, जनता बँकेचे पुरूषोत्तम उडता, सिध्देश्वर किणगी, विशाल शिंदे, ज्ञानेश्वर मॅकल, गायक दिपक कळढोणे, ज्येष्ठ विधिज्ञ धनंजय माने, डॉ. व्यंकटेश मेतन, अॅड मंकणी आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवरांसह रसिक श्रोते तसेच विविध शाळांमधील विद्यार्थी-विद्याथींनीची मोठी गर्दी होती. शेवटी शिल्पा जिरांकलगी यांनी वंदे मातरम हे गीत गायन करून कार्यक्रमाचा समारोप केला.
......चौकट
कार्यक्रम वेळेवर सायंकाळी 6.25 वाजता सुरू करण्यात आला. कार्यक्रमासाठी सोलापूर शहरातील सेवासदन, नूमवि, चंद्राम चव्हाण गुरूजी यासह विविध शाळांमधील विद्यार्थी विद्याथींनीची मोठी गर्दी होती.
सिध्दाराम पाटील यांच्या वाणीतून 'वंदे मातरम्' चा लपलेला इतिहास या विषयावर व्याख्यान एैकण्यासाठी अॅम्फी थिएटर पूर्णपणे भरलेले होते आणि व्याख्यान संपेपर्यत संपूर्ण सभागृह पीन ड्रॉप सायलेन्स अशा वातावरणात होते.
