'करो योग, रहो निरोग'... ! हजार साधकांनी योगदिंडीद्वारे केली आंतरराष्ट्रीय योगदिनाची जनजागृती

shivrajya patra

सोलापूर : आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या जनजागृतीसाठी रविवारी सकाळी शहरातून योगदिंडी काढण्यात आली. या  योगदिंडीत जवळपास एक हजार साधक 'करो योग, रहो निरोग'  यासह विविध घोषणा देत सहभागी झाले होते. 

योग दिवस समन्वय समितीचे निमंत्रक मनमोहन भुतडा यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आलेल्या या दिंडीत नगरसेवक ज्ञानेश्वर म्याकल, अमर पुदाले, चिवडशेट्टी (भारतीय योग संस्था), रघुनाथ क्षीरसागर (पतंजली योगपीठ), रवी कंटकी(विवेकानंद केंद्र ), संतोष सासवडे (योग सेवा मंडळ ), नागनाथ पाटील (योग साधना मंडळ ), अशोक गरड (सर्वोदय योग साधना मंडळ),

मोहन भूमकर (विणकर बाग योगा मंडळ), गीता परिवार साधक आणि कल्याण योग पिरामिड ध्यान मंडळासह विविध संस्था आणि त्याचे प्रमुख सहभागी झाले होते. 

ही योगदिंडी यशस्वी करण्यासाठी नागेश्वर कन्ना, बसवराज उंबरजे, भगवान बनसोडे, स्वाती राऊत, शोभा तोरणगी, सुजाता शास्त्री, नरेंद्र ताटीपामुल, रघुनाथ शिरसागर, प्रकाश जाधव, ऋषिकेश फंड, शामराव यादव, जालिंदर तुपे, अजय कलाल, यशवंत सादूल, सुजित मुजगोड, ज्योतिर्लिंग करंडे यांनी विशेष परिश्रम घेतले.

विणकर बागेतून सकाळी साडे सहा वाजता निघालेली दिंडी साखरपेठ, समाचार चौक, कोंतम चौक, जोडभावी पेठ, भुलाभाई चौक, राजेंद्र चौक, कन्ना चौकमार्गे  विणकर बाग येथे दिंडीची सांगता झाली. दिंडीसाठी जलपानाची सोय रंगनाथ येरमवार, लक्ष्मीकांत सोमाणी आणि जोडभावी पेठ युवक मंडळ यांनी केले.

To Top