शिवसेना जनसंपर्क कार्यालयामुळे सर्वसामान्य नागरिकांना मिळेल तातडीने मदत : लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील

shivrajya patra

प्रकाश राठोड यांच्या नेतृत्वाखाली शहर आणि दक्षिणमधील शिवसैनिकांसाठी हक्काचं जनसंपर्क कार्यालय उपलब्ध

सोलापूर : "येत्या काळात शिवसैनिकांसह सर्वसामान्य नागरिकांनाही या जनसंपर्क कार्यालयामुळे तातडीने मदत, शासकीय योजनांची माहिती आणि समस्यांचे निवारण एकाच छताखाली मिळणार आहे, असा विश्वास जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील यांनी व्यक्त केला.

जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर शहर व ग्रामीण भागातील शिवसैनिक तसेच गोरगरीब नागरिकांना न्याय, हक्क व अधिकार मिळवून देण्यासाठी आणि शिवसेना संघटना बांधणीसाठी प्रकाश राठोड यांच्या पुढाकाराने विजापूर रस्त्यावरील अर्जुन टॉवरमधील शिवसेना पक्षाच्या नूतनीकृत सुसज्ज जनसंपर्क कार्यालयाचा लोकार्पण सोहळा शुक्रवारी, 12 जून रोजी पार पडला. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील बोलत होते.

या कार्यक्रमात सोलापूर जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील, शिवसेना अल्पसंख्याक विभागाचे सलाऊद्दीन शेख, माजी सभापती आनंद तानवडे, नागेश पासकंठी, राजा आलूरे, तसेच शिवसैनिक यांच्या हस्ते संपर्क कार्यालयाच्या नूतनीकरणाचा नारळ फोडण्यात आला.

तसेच प्रकाश राठोड यांचा प्रशासकीय दांडगा अनुभव असल्यामुळे पक्षसंघटन वाढीसाठी आणि नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांची मोठी मदत होईल." असंही जिल्हाध्यक्ष ठोंगे-पाटील यांनी म्हटले.

आनंद तानवडे यांनी सांगितले की, "शिवसेनेच्या प्रत्येक भागात अशा प्रकारची जनसंपर्क कार्यालये उभारणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे पक्ष आणि जनता यांच्यातील संवाद अधिक बळकट होईल."

सोलापूर लोकसभा संपर्कप्रमुख धैर्यशील माने तसेच खासदार सौ. ज्योती वाघमारे यांचा अन्य ठिकाणी नियोजित दौरा असल्यामुळे त्यांनी प्रकाश राठोड यांच्या शिवसेना जनसंपर्क कार्यालय नूतनीकरणाप्रित्यर्थ शुभेच्छा पाठविल्या असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

यावेळी अंकुश राठोड, उपशहर प्रमुख राज चव्हाण, ग्रामीण उपजिल्हाप्रमुख संतोष जाधव, नवनाथ पवार, विनोद राठोड,  सागर राठोड, प्रदीप जाधव, मल्लू रोकडे, नेहरू राठोड, राहुल राठोड, दीपक पवार,  प्रदीप राठोड, विनोद जाधव, राजू पवार, तसेच नंदनवन ज्येष्ठ नागरिक संस्थेचे पदाधिकारी व असंख्य शिवसैनिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

To Top