माजी जि.प. सदस्या भागिरथी पाटील यांचं निधन; कुमठे इथं सायंकाळी अंत्यसंस्कार

shivrajya patra

सोलापूर : ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार स्वर्गीय सिद्रामप्पा पाटील यांच्या पत्नी माजी जि. प. सदस्या भागिरथी सिद्रामप्पा पाटील यांचे सोमवारी, 15 जून रोजी सकाळी दीर्घ आजाराने निधन झाले. त्या मृत्यूसमयी 82 वर्षीय होत्या. अक्कलकोट तालुक्यातील कुमठे इथं सायंकाळी अंत्यसंस्कार होणार असल्याचं सांगण्यात आलंय. 

श्रीमती पाटील यांच्या निधनाची बातमी समजताच, राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेकांकडून दुःख व्यक्त करण्यात येत आहे. 

भागिरथी पाटील यांनी जिल्हा परिषद सदस्य म्हणून पाच वर्षे कार्य करत, ग्रामीण भागातील विविध विकासकामांसाठी मोलाचे योगदान दिले होते. आपल्या साध्या, मनमिळाऊ आणि सेवाभावी स्वभावामुळे त्या सर्वसामान्य नागरिकांमध्ये लोकप्रिय होत्या. 

जनतेच्या प्रश्नांबाबत त्या नेहमीच संवेदनशील राहिल्या. त्यांचा सामाजिक कार्यातही सक्रिय सहभाग असायचा.  त्यांच्या निधनामुळे पाटील परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, कुटुंबीयांसह त्यांचे असंख्य हितचिंतक आणि समर्थक शोकसागरात बुडाले आहेत. त्या जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शिवानंद पाटील यांच्या मातोश्री होत.   त्यांच्या मूळ गांवी कुमठे इथं सायंकाळी 06 वा. अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलंय.

त्यांनी आपल्या कुटुंबाला दिलेले संस्कार, समाजसेवेची जपलेली परंपरा आणि जनसामान्यांशी राखलेले जिव्हाळ्याचा संबंध यामुळे त्या आठवण कायम स्मरणात राहणार आहेत. भागिरथी पाटील यांच्या पश्चात चार मुले, तीन मुली, सुना, जावई, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. 

To Top