पत्रकार कृती समिती आणि अप्पाश्री मित्र परिवाराच्या वतीने पदोन्नतीनिमित्त रविंद्र परबत यांचा सत्कार

shivrajya patra

सोलापूर : येथील पोलीस आयुक्तालयाकडील पोलीस कर्मचारी रविंद्र परबत यांना सहाय्यक फौजदारपदी पदोन्नती मिळाल्याबद्दल पत्रकार कृती समिती आणि अप्पाश्री लंगोटे मित्र परिवाराच्या वतीने नूतन सहाय्यक फौजदार रवींद्र परबत यांचा गुरुवारी हृदय सत्कार सोहळा पार पडला.

फौजदार चावडी पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस अंमलदार रविंद्र परबत यांची सहाय्यक फौजदार पदी पदोन्नती झाल्याबद्दल पत्रकार कृती समिती आणि अप्पाश्री लंगोटे मित्र परिवाराच्या वतीने येथील जिल्हा परिषदेतील बागेत गुरुवारी दुपारी भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी शाल, टोपी व पुष्पहार घालून त्यांचा मनःपूर्वक सत्कार करण्यात आला. 

आपली कर्तव्यनिष्ठा, शिस्तबद्ध कार्यपद्धती आणि उत्कृष्ट सेवेमुळे त्यांना ही पदोन्नती प्राप्त झाली असून, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि अधिकाधिक यश लाभावे, अशा शुभेच्छा उपस्थितांनी व्यक्त केल्या.

तिसरी आँख मानवाधिकार संघटना महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा पत्रकार कृती समितीचे अध्यक्ष अप्पासाहेब लंगोटे यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार आबा तळभंडारे, अशोक ढोणे, नितीन करजोळे, मिलिंद प्रक्षाळे, सिध्दाराम नंदर्गी, गिरमल्ला गुरव, डॉ. कीर्तीपाल गायकवाड, अक्षय बबलाद, सुरेश पाटील, आदर्श व्हसुरे, महेश जाधव, सुधीर ढोले, ऋषिकेश ढेरे, शाहिद शेख यांच्यासह अप्पाश्री मित्र परिवाराचे सदस्य, पत्रकार बांधव व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी रविंद्र परबत यांच्या जनहिताच्या कार्याचा गौरव करत त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. सत्कार सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण, आनंददायी व प्रेरणादायी वातावरणात पार पडला.

To Top