सोलापूर : ज्ञानज्योती फाउंडेशन (बेळगांवी) व श्री सिद्धयोगी प्रतिष्ठानच्या वतीने रणरणत्या उन्हापासून दिलासा मिळण्यासाठी श्री सिद्धेश्वर मार्केट यार्ड येथील 100 माथाडी कामगारांना दैनंदिन जीवनावश्यक किट देण्यात आले.
अडत व्यापारी सिद्धाराम उमदी, ज्ञानज्योती फाउंडेशनचे समन्वयक मयूर शिरशी, बाजार समिती माजी संचालक शिवानंद पुजारी, वीरशैव व्हिजन उत्सव समिती अध्यक्ष विजयकुमार बिराजदार, अब्बास शेख, शिरीष गवसने, रोहित लिगाडे, संगमेश्वर बिराजदार यांच्या हस्ते या किटचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमात उपस्थित कामगारांना आरोग्य स्वच्छता मार्गदर्शन करण्यात आले. कामगारांना देण्यात आलेल्या किटमध्ये एनर्जी सॉफ्ट ड्रिंक, ग्लुकोज पावडर, दंत क्रिम, खोबरेल तेल, हँडवॉश बॉटल या साहित्याचा समावेश होता. यावेळी विजयकुमार बिराजदार, संतोष कापसे, प्रकाश तडकल, प्रशांत लिगाडे, शिवलिंग बणजगोळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
फोटो ओळी : ज्ञानज्योती फाउंडेशन व श्री सिद्धयोगी प्रतिष्ठानतर्फे माथाडी कामगारांना जीवनावश्यक किट देताना सिद्धाराम उमदी, मयूर शिरशी, शिवानंद पुजारी, विजयकुमार बिराजदार, अब्बास शेख, शिरीष गवसने, रोहित लिगाडे, संगमेश्वर बिराजदार
