महाराष्ट्र एक्सलन्स अवार्ड 2026 ने इलेक्ट्रिक मॅन अभय डी. रंगारी सन्मानित

shivrajya patra

सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल प्रेस क्लब ऑफ इंडिया च्या वतीने गौरव

भंडारा/प्रतिनिधी : सामाजिक क्षेत्रात अद्वितीय आणि उल्लेखनीय कार्यबद्दल भंडारा येथील प्रसिद्ध समाजसेवक, लेखक, मुक्त पत्रकार, राजकीय विश्लेषक, कुशल संघटक आणि विद्युत वेगाने प्रसार-प्रचार केल्यामुळे "इलेक्ट्रिक मॅन" म्हणून जनमानसात ओळख असलेले अभय डी. रंगारी यांना आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त ISO 9001:2015 प्रमाणित डिजिटल इंडिया प्रेस क्लब ऑफ इंडिया यांच्या वतीने प्रदान करण्यात येणारा प्रतिष्ठेचा "महाराष्ट्र एक्सलन्स अवार्ड 2026" नुकताच प्रदान करण्यात आला. 

डिजिटल इंडिया प्रेस क्लब ऑफ इंडिया मलकापूर, बुलढाणा, महाराष्ट्र राज्य या संस्थेमार्फत समाजातील विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी "महाराष्ट्र एक्सलन्स अवार्ड" आयोजित केला जातो. 

पत्रकारिता, शिक्षण, साहित्य, सामाजिक, क्रीडा, राजकीय, कला, महिला सक्षमीकरण, वैद्यकीय, कायदा, सहकार आणि पतसंस्था अशा विविध क्षेत्रांमध्ये भरीव योगदान देणाऱ्या व्यक्तींना या पुरस्काराने गौरविण्यात येते. यंदाच्या वर्षी अभय डी. रंगारी यांना सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

अभय डी. रंगारी यांनी सामाजिक न्याय, संविधान जनजागृती, युवक नेतृत्व, शेतकरी प्रश्न, पर्यावरण संरक्षण, मानवाधिकार, मुक्त पत्रकारिता, मतदान जनजागृती आणि सामाजिक परिवर्तन या क्षेत्रांमध्ये सातत्याने कार्य केले आहे. विविध जनआंदोलने, रस्ता रोको, धरणे, निवेदने, युवक संघटन, जनजागृती अभियान आणि लोकहित चळवळींच्या माध्यमातून त्यांनी समाजात सकारात्मक परिवर्तन घडविण्याचा प्रयत्न केला आहे.

त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये  त्यांनी सामाजिक न्याय, संविधान जनजागृती, युवक नेतृत्व, शेतकरी प्रश्न, पर्यावरण संरक्षण, मानवाधिकार आणि मुक्त पत्रकारिता यांचा समावेश असून त्यांनी मतदान जनजागृती अभियान, संविधान सन्मान अभियान, शेतकरी हक्क आंदोलन, स्मार्ट मीटर विरोध आंदोलन, पर्यावरण व जंगल संरक्षण जनजागृती, युवक संघटन आणि सामाजिक प्रबोधन यांसारख्या महत्त्वपूर्ण उपक्रमांचे नेतृत्व केलं आहे.

अभय डी. रंगारी हे कुशल नेतृत्व, जननायक, लोकगौरव, वादळी वेदनेचा विद्रोही महाकवी, जनसामान्यांचा असामान्य बुलंद आवाज आणि विराट व्यक्तिमत्त्वाचे धनी म्हणूनही ओळखले जातात. प्रस्थापित व्यवस्थेविरोधात विस्थापितांना एकत्र करून न्याय व हक्कासाठी लढा देणारं नेतृत्व म्हणून त्यांनी स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. "आदमी देखकर आदमी की पहचान करने वाला आदमी" अशी त्यांची लोकमान्यता असून त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक सामाजिक चळवळी यशस्वीपणे राबविण्यात आल्या आहेत. सतत एक वर्ष त्यांनी पलाडी गावाला राष्ट्रीय महामार्ग नागपूर रायपूरवरून झेब्रा क्रॉसिंग, बोगदा, उड्डाण पूल मिळावा, यासाठी राष्ट्रीय किसान मोर्चा च्या माध्यमातून व गावातील लोकांच्या समस्येला प्राधान्य देऊन शासन प्रशासन यांच्याशी संविधानिक मार्गाने संघर्ष करून तब्बल 20 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात यश मिळवले."इलेक्ट्रिक मॅन" ही त्यांची ओळख त्यांच्या कार्यशैलीमुळे निर्माण झाली आहे. समाजात विद्युत वेगाने जनजागृती निर्माण करून सामाजिक प्रश्नांवर लोकांना संघटित करण्याची त्यांची क्षमता विशेष उल्लेखनीय मानली जाते. समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय आणि धर्मनिरपेक्षता या संविधानिक मूल्यांचा प्रचार आणि प्रसार हे त्यांच्या कार्याचे मुख्य केंद्रबिंदू राहिला आहेत.

शेती, शेतकरी हक्क, आधार कार्ड धोरण, शिक्षणातील काळाबाजार, स्मार्ट मीटर विरोध, अन्नसुरक्षा, पशुसंवर्धन आणि जनावरांना चराईसाठी खुले जंगल या विषयांवर त्यांनी सातत्याने आवाज उठविला आहे. रास्ता रोको, जेल भरो आणि भारत बंद आंदोलन यांसारख्या जनआंदोलनांमध्ये त्यांनी सक्रिय नेतृत्व केलं आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली सामान्य जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी विविध लोकचळवळी उभ्या राहिल्या आहेत.

युवकांमध्ये संविधानिक मूल्ये, लोकशाही, समता, बंधुता, सामाजिक जबाबदारी आणि मतदानाचे महत्त्व याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी त्यांनी उल्लेखनीय योगदान दिलं आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक युवक संघटनांची उभारणी झाली असून युवकांना सकारात्मक दिशादर्शन मिळालं आहे.

शेती व पशुसंवर्धन क्षेत्रामध्येही त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. "शेती वाचली तर शेतकरी वाचेल, शेतकरी वाचला तर देश वाचेल" या विचारधारेवर आधारित कार्य करत त्यांनी शाश्वत शेती, जल-जमीन संरक्षण, पर्यावरण संवर्धन आणि पशुधन विकासासाठी जनजागृती केली आहे.

त्यांच्या संघर्षमय आणि प्रेरणादायी जीवनप्रवासावर आधारित चित्रपटाची निर्मिती देखील होणार असून त्यामध्ये त्यांच्या सामाजिक कार्याचा, संघर्षाचा आणि परिवर्तनवादी विचारांचा प्रवास मांडला जाणार आहे. हा चित्रपट भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

रंगारी यांचे कार्य केवळ पुरस्कारांपुरते मर्यादित नाही, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, साहित्यिक आणि पर्यावरणीय क्षेत्रांवर त्याचा व्यापक प्रभाव पडला आहे. लोकशाही, मानवाधिकार, पर्यावरण संरक्षण, शेतकरी प्रश्न आणि सामाजिक न्यायासाठी त्यांनी केलेलं कार्य समाजासाठी प्रेरणादायी मानले जाते.

"नेतृत्वासाठी जन्मलेला नाही, पण परिस्थितीने नेता बनवला" आणि एकच आवरण -सुरक्षित पर्यावरण, "एकच मिशन – व्यवस्था परिवर्तन" अशी हाक देणाऱ्या इलेक्ट्रिक मॅन, जननायक अभय डी. रंगारी यांच्या महाराष्ट्र एक्सलन्स अवार्ड 2026 ने सन्मानित करण्यात आले. स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र, मेडल असं पुरस्काराचं स्वरूप आहे.  त्याबद्दल  जिल्ह्यासह संपूर्ण देशभरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

.... उल्लेखनीय कार्याबद्दल अभय रंगारी यांना आजवर मिळालेले राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार ....

1. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे समाजसेवक पुरस्कार (निवड)- छत्रपती संभाजीनगर.

2. कुशल नेतृत्व जननायक लोकगौरव पुरस्कार- मुंबई.

3. गोल्डन पिकॉक अवॉर्ड- मुंबई.

4. मानवाधिकार पुरस्कार- अहिल्यानगर.

5. डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय विचार प्रेरणा पुरस्कार- कोल्हापूर.

6. जीवनगौरव पुरस्कार- पवनी, भंडारा.

7. प्रबोधिनी स्टार पुरस्कार- चंद्रपूर.

8. प्रजासत्ताक गौरव मानवसेवा पुरस्कार- ठाणे.

9. राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले समाजभूषण पुरस्कार- नागपूर.

10. महाराष्ट्र भूषण सन्मान 2026- आनंदी युनिव्हर्स फाउंडेशन, पुणे.

याशिवाय त्यांच्या कार्याची नोंद विदर्भ बुक ऑफ रेकॉर्ड आणि जंबुद्दीप भारत नॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये होणार असल्याची माहिती समोर आली आहे. ही बाब भंडारा जिल्ह्यासाठी अभिमानाची मानली जात आहे.

To Top