01 जून रोजी वाढदिवस असलेल्या विविध क्षेत्रातील मान्यवरांचं अप्पाश्री मित्र परिवाराच्या वतीने अभिष्टचिंतन

shivrajya patra

सोलापूर/01 : पत्रकार कृती समिती व अप्पाश्री मित्र परिवाराच्या वतीने विविध क्षेत्रातील 01 जून रोजी वाढदिवस असलेल्या विविध क्षेत्रातील मान्यवरांचा टोपी, शाल व पुष्पहार घालून सन्मान करण्यात आला. हा अभिष्टचिंतन सोहळा जिल्हा परिषद येथील बागेत सोमवारी वाढदिवस सत्कार समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. 

साप्ताहिक फुलेवाद चे संपादक अशोक ढोणे, दैनिक दणका टाईम्स चे संपादक विश्वनाथ व्हनकुरे, साप्ताहिक यस बॉस चे संपादक बाशा शेख, लेटेस्ट न्यूज चे उपसंपादक इक्बाल शेख, पत्रकार सुधीर ढोले, बहुजन आजाद क्रांती सेना संस्थापक अध्यक्ष राजा बेळ्ळेनवरू तसेच बहुजन हक्क अभियान महाराष्ट्र राज्यचे संस्थापक अध्यक्ष दयानंद बनसोडे यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला.

हा कार्यक्रम तिसरी आंख मानवाधिकार संघटना महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा पत्रकार कृती समितीचे अध्यक्ष अप्पासाहेब लंगोटे आणि मित्र परिवाराच्या आयोजनाखाली पार पडला.

यावेळी सेवानिवृत्त डी.वाय.एस.पी. बिराजदार, नितीन करजोळे, लतिफ नदाफ, मिलिंद प्रक्षाळे, सिध्दाराम नंदर्गी, गिरमल्ला गुरव, राम हुंडारे, अक्षय बबलाद, अंबादास गज्जम, अश्फाक शेख, अकबर शेख, वैजिनाथ बिराजदार, यशवंत फडतरे, नितीन कांबळे, विश्वनाथ बिराजदार, विजयकुमार उघडे, विजयकुमार झुंजा, महेश जाधव, मोहन थळंगे, नरेंद्र कांबळे, अस्लम नदाफ, आदम मुलाणी, अफजल शेख, हबीब शेख, गणेश भालेराव, संगीता बिराजदार यांच्यासह अप्पाश्री मित्र परिवार, पत्रकार बांधव व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव करत सत्कारमूर्तींच्या सामाजिक, पत्रकारिता व जनहिताच्या कार्याचा गौरव केला. तसेच त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या. 

To Top