शासकीय मैदानावर चार दिवस स्पर्धा रंगणार,
राज्यातील 24 जिल्ह्यातील कुमार व मुलींचा सहभाग
सोलापूर/01 जून (स्वर्गीय अजितदादा पवार क्रीडा नगरीतून ) : कुमार व मुली गटाच्या 52 व्या राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धा मंगळवारी,02 ते 05 जून दरम्यान येथील विजापूर रोडवरील नेहरू नगर शासकीय मैदानावर 04 दिवस रंगणार आहे.
महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने आणि सोलापूर ॲम्युचर्स खो-खो असोसिएशन व किरण स्पोर्ट्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेस मंगळवारी, सकाळी साडेसहा पासून सुरुवात होणार आहे. स्पर्धेचे उद्घाटन सायंकाळी 07 वाजता निमंत्रित मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.
स्पर्धेची 'भाग्य पत्रिका' :
मुले : 'अ' गट: धाराशिव, छ. संभाजीनगर, नंदुरबार.'ब' गट: सोलापूर, धुळे, परभणी. 'क' गट: सांगली, जालना, लातूर. 'ड' गट: पुणे, पालघर, नांदेड. 'इ' गट: सातारा, रत्नागिरी, हिंगोली. 'फ' गट: मुंबई उपनगर, नाशिक, रायगड. 'ग' गट: ठाणे, बीड, सिंधुदुर्ग. 'ह' गट: मुंबई, अहिल्यानगर, जळगाव.
मुली : 'अ' गट: सांगली, नंदुरबार, जळगाव. 'ब' गट: ठाणे, परभणी, लातूर. 'क' गट: धाराशिव, मुंबई उपनगर, छ. संभाजीनगर. 'ड' गट: सोलापूर, पालघर, बीड. 'इ' गट: नाशिक, अहिल्यानगर, सिंधुदुर्ग. 'फ' गट: पुणे, जालना, नांदेड. 'ग' गट: सातारा, मुंबई, हिंगोली. 'ह' गट: रत्नागिरी, धुळे, रायगड.
सिद्धार्थ माने-देशमुख, प्राजक्ता बनसोडे सोलापूरचे कर्णधार
सोलापूर जिल्हा मुलींच्या कर्णधारपदी वेळापूर येथील अर्धनारी नटेश्वर क्रीडा मंडळाच्या प्राजक्ता बनसोडे व कुमार संघाच्या कर्णधारपदी सिद्धार्थ माने देशमुख यांची निवड सोलापूर ॲम्युचर खो-खो असोसिएशनचे सरचिटणीस उमाकांत गायकवाड यांनी जाहीर केली. या संघास असोसिएशनचे अध्यक्ष महेश गादेकर यांनी शुभेच्छा दिल्या.
कुमार संघाचे शिबिर जुळे सोलापूर येथील स्वामी विवेकानंद प्रशालेच्या मैदानावर झाले. या शिबिराचा समारोप प्राचार्य अंबादास पांढरे यांच्या हस्ते झाला. यावेळी असोसिएशनचे उपाध्यक्ष श्रीकांत ढेपे, सुनील चव्हाण, खजिनदार श्रीरंग बनसोडे, सहसचिव मोहन रजपूत, अजित शिंदे, पुंडलिक कलखांबकर, अर्जुन पवार आदी उपस्थित होते.
मुली संघाचे सराव शिबिर वसंतराव काळे प्रशाला, वाडीकुरोली येथे यशस्वीरित्या पार पडले. या सराव शिबीराचा समारोप श्रीराम शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष कल्याणराव काळे, सचिव बाळासाहेब काळे, प्राचार्य कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
जिल्हा संघ : कुमार : चव्हाण अथर्व उमेश, कौलागे सकार रामचंद्र, अधिक रोहन बिभिशन, पठाण मोहंमद माज महिबूब, संतोषसाठी जमीन, जाधव समर्थ अशोक, अतार सुहान सलीम, राऊत नामदेव राजेंद्र, माने देशमुख सिद्धार्थ अनिल, शेख अकबर दवाल, रजपूत ओंकार मोहन, पवार संदेश किसान, जावळेकर अर्जुन परमेश्वर, उपासे श्री विनायक, गवळी अभय सुनील, प्रशिक्षक : पवार गणेश, व्यवस्थापक : अनिकेत जाधव.
मुली : मांडवे अश्विनी गोविंद, सुरवसे ऋतुजा मारुती, मांडले अन्वई लक्ष्मण, लामकाने स्नेहा अनिल, बनसोडे प्राजक्ता सोमनाथ, यलमार श्रेया मनोहर, सुरवसे समृद्धी पांडुरंग, पासले ऋतुजा रामेश्वर, स्वामी मयुरी सिद्रामय्या, मुलाणी आलिया महिबूब, लामकाने कल्याणी सुनील, यलमार कार्तिकी मारुती, गंगोदा अक्षता सनमुकप्पा, नागलगाव पवित्रा इराप्पा, पवार खुशी गणेश, प्रशिक्षक : अतुल जाधव, व्यवस्थापक : केत सोनाली.
*****


