सुनावणी घेऊन आदेश देण्यासाठी स्विकारली लाच; महसूल सहाय्यकासह दोघांविरुध्द गुन्हा दाखल

shivrajya patra

 

सोलापूर : जन्म मृत्यू नोंद होण्याच्या कामात आदेश मिळण्यासाठी दाखल केलेल्या प्रकरणामध्ये तहसिलदार यांचेसमोर सुनावणी घेऊन आदेश देण्यासाठी 02 हजार रुपयांची लाच रक्कमेची मागणी करून ती स्वतः स्विकारल्याप्रकरणी लोकसेवक महसुल सहाय्यक अलीफ सुतार (नेम. तहसिल कार्यालय, पंढरपूर.) याला सोलापूर येथील एसीबी पथकानं सोमवारी रंगेहाथ पकडले.

महसूल सहाय्यक अलीफ शमशुद्दीन सुतार (वय- 29 वर्षे, रा. दामाजी नगर, धर्मगांव रोड, मंगळवेढा.) आणि खाजगी इसम मारुती ज्ञानोबा वाघमारे (वय- 50 वर्षे, रा. मु.पो. येड्राव, ता. मंगळवेढा.) अशी आरोपींची नावे आहेत.

महसुल सहाय्यक अलीफ सुतार (रा. दामाजी नगर, धर्मगाव रोड, मंगळवेढा.) आणि खाजगी इसम मारुती ज्ञानोबा वाघमारे यांनी तक्रारदार यांचेकडे त्यांनी त्यांच्या पक्षकारांचे वतीने पंढरपूर तहसिल कार्यालयाच्या जन्म-मृत्यू नोंद विभागात दाखल केलेल्या प्रकरणामध्ये तहसिलदार यांचेसमोर सुनावणी घेऊन आदेश देण्यासाठी 02 इजार रुपयांची लाच रक्कमेची मागणी केल्याचे 29 मे ते 01 जून दरम्यान झालेल्या पडताळणीत निष्पन्न झाले होते.

महसुल सहाय्यक सुतार यांनी पंचासमक्ष  लाचेची मागणी करुन ती लाच रक्कम 02 हजार रुपये ही सापळा कारवाई दरम्यान स्वतः स्विकारल्याप्रकरणी रंगेहाथ पकडण्यात आले. याप्रकरणी सुतार व खाजगी इसम वाघमारे यांचे विरूध्द पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात
भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा कलम 7, 7 अ प्रमाणे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया चालू आहे.

ही कारवाई पोलीस उपायुक्त/पोलीस अधिक्षक 
शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील, अपर पोलीस अधीक्षक ( सर्व नेमणूक-एसीबी, पुणे.)अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक प्रशांत चौगुले (एसीबी,सोलापूर.), पोलीस निरीक्षक रविंद्र लांभाते, पोलीस निरीक्षक शैलेश पवार, पोलीस हवालदार संतोष नरोटे, पोलीस हवालदार स्वामीराव जाधव, पोकॉ गजानन किणगी, पोलीस हवालदार शिरीषकुमार सोनवणे, रामभाऊ घुगे, सलीम मुल्ला, पोकॉ राजू पवार, चापोकॉ अक्षय श्रीराम (सर्व नेमणुक- एसीबी, सोलापूर.) यांनी पार पाडली.

... नागरिकांना आवाहन !
लोकसेवक शासकीय अधिकारी/कर्मचारी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजंट) हे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतरिक्त अन्य लाचेची मागणी करित असल्यास त्याबाबत तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सोलापूर कार्यालयास संपर्क साधण्याचे आवहन पोलीस उपअधीक्षक प्रशांत चौगुले (मो.क्र. 9823225465) यांनी केलं आहे.

To Top