मानवाबरोबर पशू-पक्ष्यांसाठी औषधोपचार केंद्र निर्माण केलेल्या अहिल्याराणी लोक कल्याणकारी प्रजाहितदक्ष महाराणी होत्या : राम गायकवाड

shivrajya patra

छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड सोलापूर यांच्यावतीने अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी

सोलापूर- अहिल्यादेवी होळकर यांनी संस्थानाचा कारभार हाती आल्यावर आपल्या संस्थानात जागोजागी धर्मशाळा, विहिरी-पाणवटे उभारून वाटसरुंची सोयी केल्या. मानवाबरोबर पशुपक्षांसाठी देखील औषधोपचार केंद्र उभारणाऱ्या पहिल्या राजमाता होत्या, असं मत मराठा सेवा संघाचे राम गायकवाड यांनी व्यक्त केले. 

लोककल्याणकारी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 व्या जयंतीदिनी मराठा सेवा संघ संचलित छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड, सोलापूर च्या वतीने अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास जिल्हाध्यक्ष शफीक रचभरे, राजन जाधव, माजी उपमहापौर पद्माकर काळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.

त्यांनी वन औषध लागवडीस प्रोत्साहन दिले. त्या निरपेक्ष न्याय निवाड्यासाठी प्रसिध्द होत्या. एक प्रजाहितदक्ष राज्यकर्त्या म्हणून आजही अहिल्याराणींचं नाव निघते, असंही गायकवाड यांनी यावेळी सांगितले.

या अभिवादन कार्यक्रमास नगरसेविका अकिला भागानगरी, माजी नगरसेवक हारुण शेख, कादर भागनगरी, बशीर सय्यद, राजू हुंडेकरी, रियाज पैलवान, रिझवान दंडोती, कय्युम मोहळकर, रुस्तुम शेख, काशीब बेलीफ, मोहसीन नदाफ, तन्वीर गुलजार, गफूर शेख, हारिस शेख, तन्वीर शब्बीर फुलमामडी, हुजेर बागवान, अली बागवान आदी उपस्थित होते.

To Top