सोलापूर : महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागातील कनिष्ठ श्रेणी लिपीक पंकज जगन्नाथ महाले (वय-32 वर्षे) यास तक्रारदाराकडून 04 हजार रुपयांची लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं रंगेहाथ पकडले. त्यानं तक्रारदाराच्या वडीलांचे सेवानिवृत्तीनंतर फंड आणि इतर शासकीय रक्कमा मंजूर करुन देण्यासाठी 10, 000 रुपये लाचेची मागणी करून 06, 000 रुपये लाच रक्कम यापूर्वीच स्विकारली होती, असं लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये सांगितले.
हल्ली येथील जुनी पोलीस लाईलजवळ, निराळे वस्ती येथे प्रवीण जाधव यांचे घरी भाड्याने वास्तव्यास असलेले पंकज महाले सोलापूर महानगरपालिकेत कनिष्ठ श्रेणी लिपीक (वर्ग-3) कार्यरत आहे. त्यानं तक्रारदार यांच्याकडे त्यांच्या वडीलांचे सेवानिवृत्तीनंतर फंड व इतर शासकीय रक्कमा मंजूर करुन देणेसाठी 10 हजार रुपये लाचेची मागणी करुन 06 हजार रुपये यापूर्वी स्विकाले होते. उर्वरित 04 हजार रुपये रक्कमेची मागणी केल्यानं तक्रारदारानं येथील प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयाकडे तक्रार दाखल केली. हो
त्या तक्रारीची शहानिशा आणि पडताळणी पोलीस उपअधीक्षक प्रशांत चौगुले यांनी मंगळवारी केली. त्यानंतर उर्वरित 04 हजार रुपये लाचेची रक्कम स्वतः स्वीकारली. याप्रकरणी लोकसेवक आरोपी पंकज महाले (मूळ रा. मु. पो. देहेरी उंबरपाडा, तालुका - जव्हार, जिल्हा - पालघर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून पोलीस निरीक्षक योगेश चव्हाण (एसीबी, सांगली.) या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.
ही कारवाई पोलीस उपायुक्त/पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे (एसीबी, पुणे. मो.क्र 9823167154), अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील (एसीबी, पुणे. मो.क्र 9029030530) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक प्रशांत चौगुले (एसीबी, सोलापूर. मो.क्र. 9823225465), पोलीस अंमलदार एएसआय/कोळी, पोह/ सोनवणे, घुगे, मुल्ला, नरोटे, जाधव, पोशि/पवार, राठोड, हाटखिळे, दळवी, गुरव, मपोशि/गायकवाड, शिंदे चालक पोशि/श्रीराम, रुपनवर (सर्व नेमणूक-एसीबी, सोलापूर) यांनी पार पाडली.
जनतेला आवाहन !
लोकसेवक शासकीय अधिकारी/कर्मचारी किंवा त्यांच्यावतीने खाजगी इसम (एजंट) हे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास त्याबाबत तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सोलापूर कार्यालयास संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस उपअधीक्षक प्रशांत चौगुले यांनी केलं आहे.
संपर्क पत्ता- पोलीस उपअधीक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो, श्री छत्रपती शिवाजी महाराज रंगभवन चौक, सोलापूर.
संकेतस्थळ- www.acbmaharashtra.gov.in
ई-मेल-www.acbwebmail@mahapolice.gov.in
ऑनलाईन तक्रार अॅप-acbmaharashtra.net
टोल फ्री क्रमांक - 1064
दूरध्वनी क्रमांक- 0217-2312668 व्हॉटसअॅप क्रमांक-9404001064
