सोलापूर : कृषि विभाग, महाराष्ट्र शासन (आत्मा, सोलापूर) आणि कृषि विभाग, जिल्हा परिषद सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक जयंतीनिमित्त कृषिदिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम बुधवारी,01 जुलै रोजी जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित करण्यात आला असून जिल्हा परिषद सोलापूरचे अध्यक्ष दीपक वैद्य कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
कार्यक्रमास महिला व बालकल्याण समिती सभापती अमृता वाघे, समाजकल्याण समिती सभापती संस्कृती सातपुते, शिक्षण व आरोग्य समिती सभापती चेतनसिंह केदार-सावंत , मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, आत्मा प्रकल्प संचालक कांतप्पा खोत, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शुक्राचार्य भोसले तसेच अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
यावेळी जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद सदस्य, कृषि क्षेत्रातील अधिकारी व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने सहभागी होणार असून, कृषी क्षेत्रातील विविध योजनांबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
कृषि विकास अधिकारी हरिदास हावळे व कृषि, पशुसंवर्धन व दुग्धशाळा समितीचे सभापती रामप्पा चिवडशेट्टी यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन केलं आहे.
