संभाजी ब्रिगेड एकत्रीकरण...!; मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा

shivrajya patra

सोलापूर : युवराज छत्रपती संभाजी राजे भोसले यांच्या उपस्थितीमध्ये संभाजी ब्रिगेड चे दोन्ही नेते प्रवीण गायकवाड व मनोज आखरे यांनी 25 मे रोजी पुण्यात संभाजी ब्रिगेड एकत्रीकरणाची घोषणा केली, त्या निर्णयाचं स्वागत करण्याच्या उद्देशानं शनिवारी छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याजवळ संभाजी ब्रिगेडच्या वतीने दोन्ही संभाजी ब्रिगेड एकत्रित येऊन फटाके फोडून आणि मिठाई वाटून  आनंदोत्सव साजरा करण्यात आला. 

सामूहिक जिजाऊ वंदनाने सकाळी 11 वाजता कार्यक्रमाची सुरुवात झाली. या सोहळ्यात शिवक्रांतीवीर प्रदीप कणसे आणि हर्षवर्धन मगदूम यांचा यथोचित सन्मान करण्यात  आला. यावेळी मराठा आंदोलन मनोज जरांगे-पाटील यांच्या उपोषणाला संभाजी ब्रिगेडच्या जाहीर पाठिंबा व्यक्त करण्यात आला.

यावेळी नगरसेवक किरण घाडगे ( पंढरपूर), प्रदेश संघटक प्रदीप कणसे, पुणे विभाग अध्यक्ष हर्षवर्धन मगदूम, पश्चिम पुणे विभागाचे पूर्व विभाग अध्यक्ष सुनील पासलकर, पश्चिम महाराष्ट्र माजी अध्यक्ष श्याम कदम, केंद्रीय कमिटी सदस्य दिनेश जगदाळे, 

पुणे विभागीय अध्यक्ष सचिन जगताप, सोलापूर जिल्हा अध्यक्ष संभाजी भोसले, धाराशिव संपर्कप्रमुख सोमनाथ राऊत, जिल्हाध्यक्ष आनंद काशिद, शहराध्यक्ष प्रकाश ननवरे, जिल्हा उपाध्यक्ष सदाशिव पवार, मराठा सेवा संघाचे शहराध्यक्ष सूर्यकांत पाटील, वकील आघाडीचे जिल्हाध्यक्ष गणेश कदम, धाराशिव जिल्हाध्यक्ष शरद पवार, जिल्हा कार्याध्यक्ष शेखर भोसले, 

उद्योग आघाडी शहराध्यक्ष संतोष सुरवसे, उत्तर सोलापूर तालुका अध्यक्ष जैनुद्दीन शेख, अॅडवोकेट विकास तिरेकर, जिल्हा संघटक दिलीप भोसले, माजी शहराध्यक्ष शिरीष जगदाळे, जिल्हा संपर्क प्रमुख छत्रगुण माने, जिल्हा कार्याध्यक्ष शेखर भोसले, उद्योग आघाडी शहराध्यक्ष संतोष सुरवसे, जिल्हा संघटक दिलीप भोसले, माजी शहराध्यक्ष शिरीष जगदाळे, कृष्णात पवार, बाळासाहेब बागल, सचिन चव्हाण, नितीन मोहिते, 

श्रीनिवास सावंत, परशुराम पवार, प्रा. लक्ष्मण महाडिक, हनुमंत पवार, नागेश सावंत, प्रीतम पवार, दिलीप निंबाळकर, ब्रह्मदेव पवार, नरेश मोहिते, राजू मिरकले, शिल्पकार नितीन जाधव, अभिजंली जाधव, प्रीती कदम, रूपाली ननवरे, दत्ता जाधव, राम माने, अजयसिंग सोमदळे, गोवर्धन गुंड, मारुती सावंत, प्रदीप कदम, मोहन खमीतकर, नागेश देवकर, प्रभाकर शिंदे, प्रकाश डोंगरे, राजेंद्र भोसले, सिद्धेश्वर शिंदे, आबा सावंत, प्रकाश सातपुते, पृथ्वीराज चव्हाण, प्रथमेश ननवरे, विजय पोखरकर, सुनिता घंटे, मनीषा कोळी, सोनाली सागर आदी उपस्थित होते.

To Top