दिव्यांग विद्यार्थ्यांच्या प्रबोधनासाठी कवी भगवान चौगुले यांच्या कवितांचा कार्यक्रम

shivrajya patra

 

धाराशिव : दिव्यांग विद्यार्थ्यांच्या जिल्हा स्तरीय क्रिडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमात दिव्यांग विद्यार्थ्यांच्या प्रबोधनासाठी कवी भगवान चौगुले यांच्या कवितांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. 

जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी देवदत्त गिरी व सच्चिदानंद बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली व बालाजी लोमटे यांच्या नियोजनानुसार कवी भगवान चौगुले यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी " हे मुला हे फुला" निसर्ग, गुरु महिमा, वेळ, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित "अवकाशातील तारा" गणपती बाप्पा, असा विद्यार्थी असावा अन तसा विद्यार्थी नसावा, कवितेत येण्यासाठी माझ्या, कशी करू दिवाळी, चांदण्यातला प्रवास या अशा अनेक कविता सादर केल्या. यावेळी दिव्यांग विद्यार्थ्यांनी टाळ्यांचा कडकडाट करत दाद दिली.


हा कार्यक्रम धाराशिव येथील परिमल मंगल कार्यालय येथे पार पडला. यावेळी मंचावर सच्चिदानंद बांगर, वैशाली आवाड दिव्यांग शाळांचे संस्थापक मुख्याध्यापक शिक्षक-पालक, नागरिक उपस्थित होते.

कवी भगवान चौगुले यांचा "जय हो" हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला असून चिरंजीव समर्थ चौगुले यांच्यासह "मोरपीस " हा पिता- पुत्राचा संयुक्त काव्यसंग्रह प्रकाशित झाला आहे. दैनिक लोकमत, पुण्यनगरी, तरूण भारत या वर्तमान पत्रात कविता प्रसिद्ध तसेच धाराशिव आकाशवाणीवर कविता वाचन कार्यक्रम सादर झाले आहेत.

विश्व मराठी आॅनलाईन साहित्य संमेलन, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन धाराशिव येथील कवी कट्टा येथे सादरीकरण झालं आहे तसेच अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. शासकीय कार्यक्रमात मिळालेल्या या संधीमुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

To Top