पोलीस आयुक्तालयातर्फे गायक मोहम्मद अयाज यांचा सन्मान

shivrajya patra

सोलापूर : येथील पोलीस आयुक्तालयाच्या वतीने पोलीस आयुक्त एम राज कुमार यांच्या हस्ते सोलापूरचे गायक मोहम्मद अयाज यांचा सन्मान करण्यात आला.  पोलीस आयुक्तालय स्नेहमिलन संगीत संध्या या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सोलापूर सुरमणी तथा महाराष्ट्राचे महागायक विजेते मोहंम्मद अयाज यांचा संगीत संध्या हा सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला.

या कार्यक्रमात मोहम्मद अयाज उत्सव कलाकार यांनी एकापेक्षा एक गाणी सादर करून पोलीस परिवाराची मनं जिंकली. या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून सोलापूर जिल्हा सत्र न्यायाधीश शर्मा व जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम

यांच्यासह डीसीपी विजय कबाडे, डीसीपी हसन गोहर, डीसीपी अश्विनी पाटील, एएसपी विजया कुर्री , एसीपी राजेंद्र माने , एसीपी मच्छिंद्र पंडित, उदयसिंग पाटील, 

सोलापूरचे डीन डॉक्टर जयकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत, पोलीस निरीक्षक लकडे यांच्यासह पोलीस परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हा बहारदार कार्यक्रम सोलापूर पोलीस मुख्यालयाच्या प्रांगणात पार पडला. मोहम्मद अयाज यांनी संपूर्ण पोलीस आयुक्तालय सोलापूर यांचे आभार व्यक्त केले .

फोटो : पोलीस आयुक्त एम राज कुमार, सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, पोलीस उपायुक्त हसन गोहर,  पोलीस उपायुक्त अश्विनी पाटील,  गायक मोहम्मद अयाज इत्यादी छायाचित्रात दिसत आहेत.

To Top