मुलींचे शिक्षण आहे मजबूत समाजाचा पाया : प्रादेशिक कार्यकारी संचालक ई. सत्य फणी कुमार

shivrajya patra

एनटीपीसी सोलापूरने सीएसआर उपक्रमांतर्गत मुलींना सायकलींचे वाटप

सोलापूर : "एनटीपीसी सामाजिक उन्नतीसाठी वचनबद्ध आहे. मुलींचे शिक्षण हा एका मजबूत समाजाचा पाया आहे,'' असं प्रतिपादन प्रादेशिक कार्यकारी संचालक (पश्चिम प्रदेश-१) ई. सत्य फणी कुमार यांनी केले.

कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) कार्यक्रमाचा एक भाग म्हणून, NTPC सोलापूरने जवळपासच्या गावातील ५० मुलींना बुधवारी, 18 फेब्रुवारी रोजी सायकलींचे वाटप करण्यात आले. प्रकल्प क्षेत्रातील ग्रामीण मुलींना शिक्षण घेण्यासाठी आणि स्वावलंबी होण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. एनटीपीसी सोलापूरचे प्रकल्प प्रमुख बी. जे. सी. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. 

" या सायकलींमुळे गावातील मुलींना शाळेत जाण्यास मदत होईल, ज्यामुळे त्यांच्या शिक्षणात सातत्य राहील आणि त्यांना प्रगती करता येईल, " असं प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना ई. सत्य फणी कुमार यांनी विश्वास व्यक्त केला.

या उपक्रमाचा उद्देश मुलींना सक्षम करणे आणि शाळा सोडण्याचे प्रमाण कमी करणे आहे. सायकली मिळालेल्या मुलींना आनंद झाला आणि त्यांनी एनटीपीसी सोलापूरचे आभार मानले.

एनटीपीसी सोलापूर शिक्षण, आरोग्य, स्वच्छता आणि कौशल्य विकास या क्षेत्रात अशाच सामाजिक कार्यात सहभागी होत आहे.

या कार्यक्रमाला एनटीपीसी सोलापूरचे वरिष्ठ अधिकारी, सीएसआर टीम सदस्य आणि पालक उपस्थित होते. 

To Top