नालंदा नगर बुद्ध विहारात नूतन नगरसेवकांचा सत्कार

shivrajya patra

सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेत नव्याने निवडून गेलेल्या नूतन नगरसेवक आणि नगरसेविकांचा सत्कार सोहळा येथील सुप्रसिद्ध नालंदा नगर बुद्ध विहारात पार पडला. बुद्ध विहार समितीचे अध्यक्ष शरद वाघमारे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व माता रमाई यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर यांची प्रमुख पाहणे म्हणून उपस्थिती होती.

याप्रसंगी नूतन नगरसेवक गौतम कसबे (प्रभाग-01), नगरसेविका वंदना गायकवाड (प्रभाग- 04), नगरसेवक सत्यजित वाघमोडे (प्रभाग-23), उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, आरती वाकसे आणि राजशेखर पाटील यांचा सत्कार करण्यात आला. 

नगरातील विकास कामावर लक्ष देऊन नगराचा तसेच सोलापूरचा सर्वांगिण विकास करू, असं आश्वासन सर्व नूतन नगरसेवकांनी सत्काराला उत्तर देताना दिले. यावेळी मुख्याध्यापिका मंजुश्री खंडागळे आणि अण्णासाहेब भालशंकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमास विजयकुमार क्षीरसागर, नागोराव कांबळे, प्रा. शहाजी मादाळे, उत्तम भालेकर, सिद्धार्थ सिद्धगणे, सुशीलादेवी भालशंकर, आम्रपाली गाडे, मंजुश्री खंडागळे, सुरेखा वाघमारे, रुक्मिणी खंडागळे, सुषमा माने, राजश्री वाघमारे, वनमाला गायकवाड आणि बबिता बाबरे आदी नागरिक उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुशिलचंद्र भालशंकर, कपिल क्षीरसागर, अमित सूर्यवंशी, सुमित चलवादी, चंद्रमणी वाघमारे, अशोक प्रधान, रणजीत काटे, अश्वजित दुपारगुडे, अक्षय किरात यांनी विशेष परिश्रम घेतले. 

फोटो ओळी : नालंदा नगर बुद्ध विहार नूतन नगरसेवक यांच्या सत्कार प्रसंगी नूतन नगरसेवक व नगरातील उपस्थित नागरिक छायाचित्रात दिसत आहेत.

To Top