आज खऱ्या अर्थाने संत रविदास यांच्या विचारांची आपण सर्वांना गरज : प्रा. संजय जाधव

shivrajya patra

जातीभेद नाकारुन प्रेमाचा संदेश... ! थोर विद्रोही संत रविदास यांची जयंती साजरी

सोलापूर : संत रविदास महाराज यांनी तत्कालिन विषमतावादी व्यवस्थेविरूध्द दंड थोपटून देशाला समतेचा संदेश दिला. विद्रोही संत म्हणून रविदास महाराज यांच्याकडे आदरभावना अन् गौरवाने पाहिले जाते. सर्व धर्म समभाव हा संदेश रविदास महाराजांनी दिला, तोच वसा अन् वारसा  फ्रेंड्स ग्रुप जपतो आहे. त्यांच्या विचारांची आज खऱ्या अर्थाने आपण सर्वांना गरज आहे, असं प्रतिपादन प्रा. संजय जाधव यांनी केले.

येथील संत रविदास बहुउद्देशिय सामाजिक मागासवर्गीय संस्थेच्या वतीने फ्रेंन्डस ग्रुप च्या आयोजनात हत्तुरे वस्ती येथील हरळय्या नगरात समतेचे पुरस्कर्ते आणि संत रविदास महाराज यांच्या 649 व्या जयंतीनिमित्त संत रविदास यांना अभिवादन करण्यात आले. संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन प्रा. राजेंद्र लामकाने व प्रा. संजय जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रा. जाधव बोलत होते.

याप्रसंगी प्रा. नंदकुमार  बंडगर, प्रा. दिपक शिंदे, प्रा. विनोद थोरात, प्रा. राजिव निकम, प्रा. बंडोपंत बाबर, मंडळाचे पदाधिकारी ज्ञानेश्वर बनसोडे, राहुल कोरे, राकेश कोरे, आकाश कोडवान, दौलत वनखडे, अप्पु कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

मंडळाने आजपर्यंत रक्तदान शिबिर, अन्नदान, आरोग्य शिबीर तसेच महान संत  महापुरुषांच्या विचारांचा जागर व्हावा, म्हणून एक ग्रंथ भेट देण्याचा उपक्रमही ही संस्था राबवते, असे सामाजिक उपक्रम घेऊन ही जयंती साजरी केल्याचे राकेश कोरे यांनी याप्रसंगी सांगितले.

To Top