महाशिवरात्रीनिमित्त गरजू व निराधार बांधवांना फराळ वाटप; भक्ती आणि सेवेचा दुहेरी संगम
सोलापूर : महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त मंदिरात “हर हर महादेव”च्या जयघोषात वातावरण भक्तीमय झाले असताना, दुसरीकडे मानवतेची खरी पूजा साकारत होती. आस्था फाउंडेशन संचलित आस्था रोटी बँक यांच्या वतीने गरजू, निराधार व रुग्णांच्या नातेवाईकांना उपवासाच्या फराळाचे स्नेहपूर्वक वाटप करण्यात आले.
महाशिवरात्रनिमित्त महादेव भगवान चे प्रतिमेस पूजा करण्यात आले. सुनील शरणार्थी, सचिन कुलकर्णी, अॅड. नीता मकणी, अॅड. साधना सांगवी, तसेच योग प्रभा मंडळ अध्यक्षा प्रभा कोडले, आस्था रोटी बँकेचे सल्लागार राजू हौशेट्टी, आस्था रोटी बँकेचे विजय छचुरे यांची यावेळी उपस्थिती होती. त्यानंतर हॉस्पिटलमधील रुग्ण व त्यांचे आप्तेष्ठांना फराळ वाटप करण्यात आले. 
सिव्हिल हॉस्पिटलमधील पेशंट व नातेवाईकांना तसेच निराधार वृद्धाश्रम व झोपडपट्टी भाग व इतर गरजूंमध्ये हा उपक्रम राबविण्यात आला.
साबुदाणा खिचडी, राजगिरे लाडू, वेफर्स, खजूर, ताक, शेंगदाणे लाडू व फळांचे वितरण करत अनेकांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलले. हे अन्न केवळ फराळ नव्हते, तर ती होती आपुलकीची ऊब, आधाराची भावना आणि शिवभक्तीची खरी अनुभूती... ! या सेवाकार्यामागे संस्थेचे संस्थापक विजयकुमार छंचुरे यांची समाजसेवेची प्रेरणा असून, स्वयंसेवकांनी निःस्वार्थ भावनेने परिश्रम घेत हा उपक्रम यशस्वी केला.
यावेळी विद्या सिंघम, सविता जोशी, संपदा जोशी, स्नेहा वनकुद्रे, अनिता तालीकोटी, पुष्कर पुकाळे, संगीता छंचुरे, मंगल पांढरे, ज्योत्स्ना सोलापूरकर, कविता स्नेहा, मेहता, विद्या राऊत, उमा शाबादे, रुक्मिणी लवटे, गीता दळवी, अविनाश मार्चला, सुरेखा पाटील, विनोद भोसले, दत्तात्रय दळवी, प्रकाश डोंगरे, अंजली शिरसी, सचिन शिंदे, विजय छंचुरे आदींचा सहभाग लाभला.
महाशिवरात्रीच्या निमित्ताने “आपल्या आनंदातील थोडासा अंश गरजूंना अर्पण करूया” असा भावनिक संदेश संस्थेने दिला.
“भुकेल्याच्या पोटी अन्नाचा घास ठेवला की, महादेव स्वतः प्रसन्न होतो.”
फोटो ओळ : महाशिवरात्री निमित्त गरजू निराधार बांधवाना फराळ वाटप करताना राजू हौशेट्टी, विजय छंचूरे, सुनील शरणार्थी, सचिन कुलकर्णी, एडवोकेट नीता मंकनी, संपदा जोशी, स्नेहा वनकुद्रे, अनीता तालिकोटि आदी छायाचित्रात दिसत आहेत.
