सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्यात धर्म-जात भेद नव्हता, प्रत्येक प्रजेला समान न्याय आणि सन्मान होता. राजे फक्त महाराष्ट्राच्या मातीचा नव्हे, तर संपूर्ण देशाचा अभिमान आहे, असं पत्रकार कृती समितीचे अध्यक्ष अप्पासाहेब लंगोटे यांनी म्हटले.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 0396 व्या जयंतीनिमित्त पत्रकार कृती समिती अध्यक्ष अप्पासाहेब लंगोटे यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी अप्पासाहेब लंगोटे बोलत होते.

स्वराज्य संकल्पक शहाजी राजे आणि राष्ट्रमाता जिजाऊंच्या स्वप्नातील हिंदवी स्वराज्याची निर्मिती करणारे शिवाजी महाराज एकमेव अद्वितीय राजे होते. त्यांनी केवळ राज्य नाही तर न्याय, समता, नितीमत्ता आणि स्वाभिमान यांचा कृतिपाठ त्यांनी जगासमोर ठेवला, असंही अध्यक्ष लंगोटे यांनी यावेळी म्हटले.

यावेळी पत्रकार कृती समितीचे नितीन करजोळे, लतिफ नदाफ, नाना प्रक्षाळे, युनुस अत्तार, गिरमल्ला गुरव, राम हुंडारे, अक्षय बबलाद, राजाभाऊ बेळ्ळेनवरू, बापुसाहेब कारंडे, सिद्धाराम नंदर्गी, नितीन कांबळे, सादिक शेख, महेश जाधव, अस्लम नदाफ, सुरज रजपुत, सिद्धू पुजारी, इम्तियाज अक्कलकोटे, श्रीनिवास बनसोडे, नरेंन सब्बन, चंद्रशेखर आळंगीकर, दीपक महिंद्रकर, सुभाष फुलारी आदी संपादक व पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
