आमदार रोहित पवार यांना तातडीने द्यावी झेड प्लस सुरक्षा; राज्य सरकारकडे मागणी

shivrajya patra

सोलापूर : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेतील मृत्यूसंबधी राज्यातील जनतेच्या मनात ज्या शंका आहेत, त्या आमदार रोहित पवार हे सातत्याने पत्रकार परिषदेच्या माध्यमातून बोलून दाखवत आहेत. हा हत्येचा नियोजित कट असेल तर त्या कटात सहभागी असलेल्या मंडळींकडून आमदार रोहित पवार यांच्याही जीवित आला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे राज्य सरकारने आमदार पवार यांना राज्य सरकारने तातडीने झेड प्लस सुविधा देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार आणि युवा सेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आलीय.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे पक्षाचे आमदार रोहित पवार अजित पवार यांना न्याय मिळवून देण्यासाठी विविध प्रश्न उपस्थित करत आहेत, सातत्याने त्या विरोधात आवाज उठवत आहेत. ही दुर्घटना नसून ही सूनियोजित हत्या असेल आणि महाराष्ट्राच्या एका उपमुख्यमंत्र्याची हत्या घडवून आणण्याची क्षमता असलेले लोक यामध्ये जर सहभागी असतील तर निश्चितच त्या लोकांकडून आमदार रोहित पवार यांच्याही जिविताला धोका निर्माण झालेला आहे. 

या पार्श्वभूमीवर, आमदार रोहित पवार यांना सरकारने तातडीने झेड प्लस सुरक्षा प्रदान करावी, अशी आग्रही मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व युवा सेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने करण्यात आली आहे. 

आमदार रोहित पवार हे सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात केंद्रबिंदू असून, "सत्य बोलणाऱ्याचा आवाज दाबण्यासाठी कोणत्याही थराला जाण्याची शक्यता महाराष्ट्रात निर्माण झाली आहे. त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी पूर्णतः राज्य सरकारची आहे, अशी दोन्ही पक्षांची भावना आहे.

शुक्रवारी उभय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या मागण्यांचं निवेदन सोलापूरचे जिल्हाधिकारी यांना प्रत्यक्ष भेटून देण्यात आले. त्यावेळी जिल्हाधिकारी यांनी हा खूप संवेदनशील विषय असल्याने हे निवेदन त्वरित राज्य सरकारकडे पाठवण्यात येईल, असं सांगितले. 

यावेळी प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत बाबर, युवा सेनेचे उपसचिव रणजीत बागल, डॉ. योगेश रणदिवे, प्रशांत गायकवाड, मुसा आत्तार, अजित पात्रे, अमित मोतेवार, मिलिंद गोरे, मोहित निकम, अमरसिंह खांडेकर, युनुस अत्तार आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

📍मागणीचे प्रमुख मुद्दे ...

* विमान दुर्घटनेची आंतरराष्ट्रीय एजन्सीकडून सखोल चौकशी करून दोषींना कडक शासन करावे, 

* व्हीएसआर व्हेंचर्स (VSR Ventures) ही नवी दिल्लीस्थित एक खाजगी विमान वाहतूक कंपनी (charter operator) या दुर्घटनेत दोषी असून त्यावर त्वरित बंदी घालावी. 

* लोकप्रतिनिधीला जर मोकळेपणाने बोलल्यामुळे जीवाला धोका निर्माण होत असेल, तर ही लोकशाहीसाठी चिंतेची बाब आहे. 

* आमदार रोहित पवार यांना तात्काळ झेड प्लस सुरक्षा देण्यात यावी, व त्यांच्यावरील संभाव्य धोका टाळण्यास मदत करावी, अशी विनंतीही राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडं या निवेदनाद्वारे करण्यात आलीय.


To Top