प्रजासत्ताक दिनी शाक्य ' सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी संस्थेच्या वतीने डॉ. आंबेडकरांना मानवंदना

shivrajya patra

सोलापूर : भारतीय प्रजासत्ताक दिनी, सेवानिवृत्त पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांची शाक्य संस्था, यशसिद्धी आजी-माजी सैनिक वेल्फेअर असोसिएशन सोलापूर युनिट, सोलापुरातील बहुजन डॉक्टर्स आणि वकील संघटनेच्या वतीने त्यांच्या-त्यांच्या ड्रेसकोडमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देण्यात येणार आहे, हा सोहळा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील (पार्क) डॉ.आंबेडकर पुतळ्याजवळ सकाळी 09.30 वा. होणार असल्याची माहिती शाक्य सामाजिक संस्थेचे अध्यक्ष डॉ. अगंद मुके यांनी दिलीय.



सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचं संघटन अशी सर्वत्र ओळख असलेल्या शाक्य संघ ‌, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी कर्मचारी सामाजिक  बहुउद्देशीय संस्थेचं राज्यातील जवळपास 10 जिल्ह्यात सक्रीय कार्य सुरु आहे. या संस्थेच्या माध्यमातून, स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिवस, धम्मचक्र प्रवर्तन दिन आणि महापरिनिर्वाण दिनी १ जानेवारी शौर्य विजयस्तंभ भीमा कोरेगाव , १४ जानेवारी नामांतर दिन  भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती  संभाजीनगर या ठिकाणी  सर्वांनी एकसंघपणे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करावं, अशी प्रांजळ भूमिका आहे. 

त्याचाच कृतिशील कार्यक्रम म्हणून शाक्य संघ,  सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेचं कार्य सोलापूर, पुणे, नागपूरसह राज्यातील 10 जिल्ह्यात पोहोचलं आहे. या कार्यास व्यापकता देण्यासाठी सोमवारी, प्रजासत्ताक दिनी सकाळी 09.30 वा. होत असलेल्या मानवंदना सोहळ्यास वैद्यकीय सेवेतील डॉक्टर्स आणि विधी सेवेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी मंचचे पदाधिकाऱ्यांना तसेच सदस्यांना निमंत्रित करण्यात करण्यात आलं आहे.

यावेळी डॉक्टर्स आणि वकील बहुजन बांधवांनी आपापल्या ड्रेसकोडमध्ये उपस्थित राहावं, असं आवाहन अध्यक्ष डॉ. अंगद मुके यांनी केलं आहे. प्रजासत्ताक दिनी राज्यातील 10 जिल्ह्यात एकाच वेळी मानवंदनेचा हा सोहळा पार पडणार असल्याचंही डॉ. मुके, अशोककुमार दिलपाक. शिवपुत्र घटकांबळे यांनी सांगितले.

***

To Top