सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगांव येथे ग्रामपंचायतीच्या वतीने स्वच्छता दूत उध्दव नरहरी जाधव यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकावून 77 वा भारतीय प्रजासत्ताक दिन साजरा झाला. यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने ध्वज फडविण्याचा मान स्वच्छता दूताला मिळाला.
प्रारंभी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, बॅरिस्टर बाबासाहेब भोसले प्रशाला आणि कासेगांव कनिष्ठ महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत कासेगांव येथील शहिद स्मारकावरील शहीद सैनिक शिवराम विश्वनाथ चौगुले आणि पहिल्या जागतिक महायुध्दात (1914-1919) हौतात्म्य पत्करलेल्या 
शहिदाच्या स्मृति स्तंभास विजय नाना माने आणि गिरीजप्पा लातूरकर यांच्या हस्ते रामहरी चौगुले आणि माजी सैनिक तथा ग्रामपंचायत सदस्य शहाजहान शेख यांच्यासह अन्य सदस्यांच्या उपस्थितीत पुष्पहार अर्पित करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी स्वच्छता दूत उध्दव जाधव यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकविण्यात आला. त्यानंतर भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन करण्यात आले. तद्नंतर ध्वजगीत, राष्ट्रगीत आणि 'जय जय महाराष्ट्र माझा' या राज्य गीतानं राज्याच्या गौरवशाली परंपरेचं स्मरण करण्यात आले. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने जिल्हा परिषद प्राथमिक शान
(सर्व छायाचित्रे : सागर सुतार)
सरपंच यशपाल वाडकर, शंकरराव येणगुरे, माजी सरपंच नेताजी पाटील, शहाजहान शेख ज्ञानेश्वर रोकडे, बिरु मोटे, प्रविण उपाख्य हरी चौगुले, विश्वजीत चौगुले, विलास वाडकर, तलाठी आरीफ हुडेवाले, दोन्ही शाळांचे शिक्षक, ग्रामपंचायतचे सर्व कर्मचारी यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
