भारताचे संविधान अन् लोकशाहीचे रक्षणासाठी बामसेफ-भारत मुक्ती मोर्चाची रॅली

shivrajya patra

सोलापूर : भारताचे संविधान आणि लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी आणि आर एस एस-भाजपच्या लोकांनी षड्:यंत्रपूर्वक बामसेफ आणि भारत मुक्ती मोर्चाच्या राष्ट्रीय अधिवेशनाची परवानगी रद्द केल्याच्या निषेधार्थ देशव्यापी चरणबद्द आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनाच्या तिसऱ्या टप्प्यात जिल्हा मुख्यालयावर बुधवारी,28 जानेवारी रोजी सकाळी 11 वा. रॅली प्रदर्शन काढण्यात येणार असल्याची माहिती ॲड. योगेश शिदगणे आणि बापू मस्के यांनी दिलीय.

भारत मुक्ती मोर्चा, राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा आणि राष्ट्रीय परिवर्तन मोर्चासह अन्य समविचारी संघटना या रॅलीत सहभागी होणार आहेत.

महात्मा बसवेश्वर सर्कल अर्थात कोंतम चौक येथून या रॅलीस सकाळी 11 वा. प्रारंभ होत असून मधला मारुती, माणिक चौक, विजापूर वेसमार्गे ही रॅली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पूनम गेट इथं धडक मारणार आहे.  जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर रॅली पोहोचल्यावर त्याचं सभेत रुपांतर होणार असल्याचंही सांगण्यात आलंय.

लोकशाही आणि संविधानाचा गळा घोटणाऱ्या RSS आणि BJP च्या विरोधात आणि लोकशाही अधिकारांच्या समर्थनात ही रॅली  आयोजन करण्यात आलं आहे. तरी सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील सर्व बहुजन समाजातील संविधान प्रेमी, हितचिंतक, समर्थक, विद्यार्थी, महिला, कामगार, डॉक्टर, शिक्षक, वकील आणि इतर बुद्धिजीवी वर्ग सर्वांनी मिळून ही रॅली यशस्वीपणे पार पाडावी, असं आवाहन उभयतांनी केलं आहे.

To Top