अंजुमन हायस्कूल व ज्युनियर कॉलेज येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

shivrajya patra

पुणे : अंजुमन हायस्कुल व ज्युनियर कॉलेज, जुन्नर येथे  77 वा प्रजासत्ताक दिन उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी अंजुमन इत्तेहाद ट्रस्टचे अध्यक्ष हाजी मिर्जा कहस बेग यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव शकील शेख होते. 

प्रारंभी महाविद्यालयाचे स्काऊट गाईडचे विद्यार्थ्यांनी प्रमुख अतिथींना सन्मापूर्वक बँड पथकासह ध्वजापर्यंत आणले. यावेळी संस्थेचे सदस्य सिराज शेख, सईद बेग, मोहम्मद उमर, एजाज बेग, मुबीन शेख, सईद शेख, अ. रजाक सय्यद, शरीफ कागदी, 

माजी विद्यार्थी रऊफ इनामदार, अल्ताफ इनामदार, ए. एम. चे अयाज शेख, नगरसेवक वाजिद इनामदार, आकिब इनामदार, साकी सय्यद, रिजवान पटेल तसेच 1995 बॅचचे माजी विद्यार्थ्यांनी शाळेसाठी छत्तीस हजार रूपये विज्ञानाचे साहित्य संच भेट दिले. 

माजी विद्यार्थी नईम मनियार, शगुफ्ता इनामदार, डॉ. परवीन, डॉ. कैसर कागदी हे उपस्थित होते डॉ. कैसर कागदी यांनी मनोगत व्यक्त करताना शालेय आठवणींना उजाळा देत भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रिजवान शेख, फिरोजा शेख, शबनम खान, उजेर, साजीद दायमी, निलोफर इनामदार, स्काऊट कॅप्टन, सर्फराज अत्तार, गाईड कॅप्टन जुबेदा शेख, फाइक शेख, तौसिफ शेख यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन उजेर सर अन् सना शेख यांनी तर मुख्याध्यापक इन्तेखाब शेख यांनी आभार मानले.

To Top