शमा उर्दू शाळेत 77 वा प्रजासत्ताक दिवस उत्साहात साजरा; सांस्कृतिक कार्यक्रमाचंही सादरीकरण

shivrajya patra

सोलापूर :  मजरेवाडी येथील शमा उर्दू प्राथमिक शाळेत 77 वा प्रजासत्ताक दिवसानिमित्त प्र. मुख्यध्यापिका यास्मिन अ. मन्नान बिजापूरे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष अय्यूब अहमद अध्यक्षस्थानी होते.

याप्रसंगी माजी प्राचार्य अब्दुल मन्नान शेख, सोशल चे माजी मुख्यध्यापक हाजी तजम्मुल हुसेन चाँदा आणि अब्दुल कुद्दूस यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमाच्या सादरीकरणात स्व. नसीम मन्नान व शाहीन सदफ लिखित स्वागत गीत, देशभक्तीपर गीते सादर केले, तर उर्दू, मराठी, इंग्रजी भाषेत मुलांनी वक्तृत्व कौशल्य दाखवून उस्थितांची मनं जिंकली.

प्रमुख पाहुणे चाँदा, शेख, नल्लामंदू यांनी विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले. अबरार अहमद यांनी सर्व पाहुण्यांना शाल-बुके देऊन त्यांचा सत्कार केला. यावेळी विविध स्पर्धेतील यशवंत प्राप्त विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देऊन कौतुक करण्यात आले.

कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शाहीन शकील नल्लामंदू यांनी केले तर आसिया बिजापूरे यांनी सर्व उपस्थितांचं आभार व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी दिलशाद अ. रजाक, जुबेद सैदखा, मेअराज अल्लोळी यांनी खूप परिश्रम घेतले.

To Top