रोटरी क्लब ऑफ सोलापूर स्मार्ट सिटीतर्फे 'दहावीनंतर पुढे काय?' या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

shivrajya patra

सोलापूर : येथील अक्कलकोट रोड येथील रोशन मराठी व उर्दू प्रशाला येथे रोटरी क्लब ऑफ सोलापूर स्मार्ट सिटीतर्फे “दहावीनंतर पुढे काय?” या विषयावर मार्गदर्शन शिबिर  आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाला एकूण 105 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. 

यावेळी रोटरी क्लब ऑफ सोलापूर स्मार्ट सिटीचे अध्यक्ष डॉ. अकबर नदाफ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये पुढील शिक्षणासाठी संभ्रम असतो, विद्यार्थ्यांनी आपापल्या कौशल्याप्रमाणे योग्य करिअरची निवड जर केली तर ते त्यांच्या भविष्यात यशस्वी होतील. दहावीनंतर अकरावी-बारावी व पदवी या पारंपारिक शिक्षणाशिवाय दहावीनंतर विविध व्यवसायिक अभ्यासक्रमामध्ये जसा अभियांत्रिकीमधील संधी यावर मार्गदर्शन करण्यात आले. 

कला, वाणिज्य व विज्ञान शाखेमधून बारावीनंतर पुन्हा अभियांत्रिकी क्षेत्रात कसे जाता येईल, यावर देखील भर देण्यात आला. या कार्यक्रमाला एकूण 105 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक बी. जे. इंगळगी उपस्थित होते. 

सूत्रसंचालन एस. बी. मळ्ळी यांनी केले. मार्गदर्शन सत्रात बी. आय. इंगळगी, एस. ए. मुलाणी तसेच शिक्षिका सौ. उजमा शेख उपस्थित होते. कार्यक्रमास रोटे. महेश साळुंके यांची विशेष उपस्थिती होती. शेवटी रोटे. बसवराज बिराजदार यांनी आभार मानले.

To Top