जैन सोशल ग्रुपच्या वतीने रविवारी गरजू व्यक्तींना कृत्रिम हात बसवणार; सम्राट चौकातील तेरापंथ भवन येथे आयोजन

shivrajya patra

सोलापूर : जैन सोशल ग्रुप इंटरनॅशनल अंतर्गत सोलापूर झोन जैन सोशल ग्रुप, इनाली फाउंडेशन पुणे, रोटरी क्लब पुणे, डाऊन टाऊन, तेरापंथी सभा, आयडब्लूसी स्टारलेट, लायन्स क्लब ऑफ सोलापूर मिडटाऊन यांच्या वतीने रविवारी, 01 फेब्रुवारी रोजी इलेक्ट्रॉनिक कृत्रिम हात बसविण्याचे शिबिर आयोजित करण्यात आलं आहे. हे शिबिर पूर्णतः मोफत असल्याची माहिती अध्यक्ष चेतन सुराणा यांनी दिली.

हे शिबिर येथील तेरापंथ भवन, सम्राट चौक (हॉटेल चित्राच्या पाठीमागे) सकाळी 10 ते दुपारी 01 या वेळेत होणार आहे. बसविण्यात येणारे कृत्रिम हात वजनाने हलके आहेत. वापरण्यास सुलभ आहे. तसेच याच ठिकाणी गरजूंना समुपदेशनही करण्यात येणार आहे.

सचिव महेश नळे, तेरापंथी अध्यक्ष कैलाश कोठारी, आयडब्लूसी स्टारलेट अध्यक्ष सोनिया चंकेश्वरा, लायन्स क्लबचे अध्यक्ष देवेंद्र बिराजदार आदी मान्यवर, सदस्य, पदाधिकारी नियोजन करीत आहेत. जास्तीत जास्त गरजवंतांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असं आवाहन संयोजकांनी केले आहे.

या शिबिरामुळे शहरातील अनेक गरजवंतांना मदत होईल आणि आयुष्यातील अडचणी दूर होऊन जगणे सुखकर होईल. जीवन सुखी, आनंदी होईल. या शिबिराचा शहर परिसरातील गरीब, गरजवंत नागरिकांनी आवर्जुन लाभ घ्यावा, असं आवाहन केले आहे.

To Top