सोलापूर : फर्निचर व्यवसायाकरीता 04 लाख रुपये माहेरून घेऊन ये असा तगादा लावून विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पती अक्षय गांधी याच्यासह सासरच्या 05 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. 35 वर्षीय सौ. दिपाली अक्षय गांधी असं पिडीतीचं नाव आहे.
विजापूर रस्त्यावरील मंत्री चंडक पार्कजवळील हरेकृष्ण विहारमधील रहिवासी सौ. दिपाली हिस तिच्या सासरची मंडळी चारित्र्यावर संशय, आई-वडिलांच्या नावाने टोमणे
मारुन हाताने मारहाण-शिवीगाळ आणि दमदाटी करीत शारीरीक व मानसिक त्रास देऊन छळ करीत होते, त्यातच त्यांच्या चार लाखाच्या मागणीचा अट्टहास 2016 साली लग्न झाल्यावर 01 महिण्यापासून सुरु होता.
या छळास कंटाळून सौ. दिपालीने पोलीसांकडं धाव घेतली. तिच्या फिर्यादीनुसार विजापूर नाका पोलीस ठाण्यात पती अक्षय गांधी, सासरे अरुण गांधी, सासु वसुधा गांधी, नणंद क्षितीजा गांधी आणि आजी सासु सुरेखा मेहता या आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस हवालदार चव्हाण या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.
