दिलीपराव माने शिक्षण संकुलनातर्फे पूरग्रस्तांना मदतीचा हात

shivrajya patra

उत्तर सोलापूर : तालुक्यातील होनसळ येथील डी.एम. प्री प्रायमरी, दिलीपराव माने प्राथमिक माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक व विद्यार्थ्यांनी पूरग्रस्त शेतकरी, कामकरी, कष्टकरी जनतेस मदतीचा हात म्हणून गहू 150 किलो ज्वारी 125 किलो व साखर 50 किलो संकलन करून आपत्ती व्यवस्थापन तहसील कार्यालय सोलापूर यांच्याकडे संस्थेच्या संचालिका पंचायत समिती माजी सभापती रजनी भडकुंबे यांच्या हस्ते तहसीलदार निलेश पाटील यांना सुपूर्द केले. 

यावेळी तहसीलदार निलेश पाटील यांनी संस्थेच्या व शाळेच्या स्तुत्य उपक्रमाबद्दल आभार व्यक्त केले. 

यावेळी संस्थेचे सहसचिव अमित भडकुंबे, मुख्याध्यापक राजेंद्र मोहोळकर, धर्मदेव शिंदे, उमेश जगताप, अख्तर सय्यद, रोशनी कांबळे, सुप्रिया पवार, शशिकांत गायकवाड, विकी माने आणि विद्यार्थी उपस्थित होते.

To Top