सोलापूर : महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक व कर्मचारी महासंघाच्या वतीने अशोका विजयादशमी आणि 69 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महासंघाचे प्रदेशाध्यक्ष समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर आणि राज्य सरचिटणीस प्राचार्य बोधिप्रकाश गायकवाड यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी महासंघाचे राज्य उपाध्यक्ष रमेश लोखंडे, जिल्हाध्यक्ष प्रा. युवराज भोसले, जिल्हा सरचिटणीस रवी देवकर, दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्ष दत्तात्रय शिंदे, इंनूस बाळगी, आगतराव बनसोडे, सचिनकुमार गोडसे, विदुर शेळके, सिद्धेश्वर भुरले, विठ्ठल मोरे, रत्नदीप कांबळे, प्रा. डॉ. मारुती शिंदे, अंगद जेटीठोर, महिबूब तांबोळी, निर्मला मौळे, स्वप्नजा कसबे, प्रिया कदम, बी एस विजयमाने इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
