Type Here to Get Search Results !

जिल्ह्यातील सन 2025 वर्षातील स्थानिक सुट्ट्या जाहीर

सोलापूर : सन 2025 या वर्षातील स्थानिक सुट्ट्या जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जाहीर केल्या आहे. सन 2025 या वर्षात तीन स्थानिक सुट्ट्या देण्यात आल्या आहेत.

यामध्ये मंगळवारी, 14 जानेवारी 2025 रोजी मकरसंक्रात, सोमवारी, 22 सप्टेंबर 2025 रोजी घटस्थापना, सोमवारी, 20 ऑक्टोबर 2025 रोजी नरक चतुर्दशी , या सुट्ट्यांचा समावेश आहे.

या स्थानिक सुट्ट्या जिल्ह्यातील सर्व राज्य शासकीय,कोषागार कार्यालये यांना लागू राहतील.