समता सैनिक दलाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना

shivrajya patra

सोलापूर : अशोका विजयादशमी आणि 69 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन या निमित्ताने समता सैनिक दल शहर जिल्हा सोलापूर यांच्या वतीने जिओसी सुमित्रा केरू जाधव आणि समता सैनिक दलाचे ज्येष्ठ मार्गदर्शक समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली. 

अशोका विजयादशमी आणि 69 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन या निमित्ताने समता सैनिक दल शहर जिल्हा सोलापूर यांच्या वतीने धम्म संस्कार सोहळा आयोजित करण्यात आलेला होता. समता सैनिक दलाच्या जीओसी सुमित्रा केरू जाधव, आकाशवाणी दूरदर्शनचे अधिकारी डॉ. अरविंद माने, सिव्हिल सर्जन डॉ. औदुंबर मस्के यांच्या शुभहस्ते नॉर्थकोट प्रशालेच्या मैदानावर ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर नॉर्थकोट प्रशाला ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत संचलन करण्यात आले. त्यानंतर भीम गीत सादर करण्यात आले. या भीम गीता नंतर संचलन संपन्न झाले. 

या संचलनामध्ये समता सैनिक दलाचे ज्येष्ठ सैनिक तथा समता सैनिक दलाचे महासचिव अनिल जगझाप, मुकुंद चंदनशिवे, संभाजी तळभंडारे, आनंद शिंदे, जितेश सुरवसे, अभिमन्यू शिंदे, विठ्ठल थोरे, रत्नदीप कांबळे, अंगद जेटीथोर, सुनील डांगे, माणिक आठवले, शाहू दावणे, कुणाल जानराव, विनोद जाधव, अंकुश बनसोडे, बाळासाहेब मस्के, सुजित हावळे, अरुण गायकवाड, ज्ञानेश्वर प्रक्षाळे, अरुण भालेदार, सुरज प्रक्षाळे, सम्राट प्रक्षाळे, प्रज्वल डोळसे, प्रिपोवेल जाधव, मनोज कसबे, गजेंद्र साळवे, दिपक नागटिळक, सुनीता गायकवाड, सुचित्रा थोरे, आशालता आव्हाड, लीना गायकवाड, अंजली गायकवाड, चंपा सुरवसे, वर्षा जाधव, प्रीती जाधव, जयश्री रणदिवे, अनुसया गंधले इत्यादी महिला-पुरुष सैनिक उपस्थित होते.

संचालनाचं नेतृत्व मुकुंद चंदनशिवे आणि विनोद जाधव यांनी केले समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर यांनी धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे महत्त्व पटवून दिल्यानंतर अनिल जगझाप यांनी सर्वांचे आभार मानल्यानंतर सकाळ सत्राचा समारोप झाला.

To Top