यशदा चे विद्यमान उपसंचालक मल्लिनाथ कलशेट्टी यांचं कासेगांव हद्दीत स्वागत

shivrajya patra

कासेगांव : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानचे मुख्य प्रवर्तक, सेवानिवृत्त जिल्हाधिकारी, तथा यशदा चे विद्यमान उपसंचालक मल्लिनाथ कलशेट्टी तुळजापूरला पायी चालत जात असताना कासेगांव हद्दीत आल्यावर हॉटेल समृद्दी चे मालक सोमनाथ खारे यांच्या हस्ते कलशेट्टी दाम्पत्यांचा स्वागतपर सत्कार करण्यात आला. 

यशदा चे विद्यमान उपसंचालक मल्लिनाथ कलशेट्टी यांचे आजवरचे संबंध लक्षात घेता, कासेगावचे लोकनियुक्त सरपंच यशपाल वाडकर यांना आवर्जून कॉल करून भेटीसाठी बोलावून घेतले. यावेळी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाबद्दल महत्वपूर्ण मार्गदर्शन केले. 

या अभियानात पूर्ण ताकदीने उतरण्याचा व वैशिष्टपूर्ण उपक्रम राबवण्याचा निर्धार करण्यात आल्याचे सांगून ही भेट ग्रामविकासाबद्दल त्यांची असलेली तळमळ अधोरेखित करणारी तर होतीच, त्याचबरोबर आम्हा सर्वांना प्रेरणादायी ठरली, असं सरपंच वाडकर यांनी म्हटलंय.

यावेळी उपसरपंच ज्ञानेश्वर रोकडे, उळेगांवचे सरपंच प्रतिनिधी आप्पा कोळी, मनोज गुंड, गंगेवाडीचे सरपंच प्रशांत जाधव, ग्रामपंचायत सदस्य राम पाटोळे, गुरु काटकर, केदार ढेकळे, दिनेश भोसले, सागर सुतार आदी उपस्थित होते.

To Top