सोलापूर : शासकीय अधिकारी व कर्मचारी कला क्रीडा साहित्य व सांस्कृतिक मंच सोलापूर यांच्या वतीने भारतरत्न सर, "मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या" यांच्या जयंतीदिनाच्या निमित्ताने वितरण करण्यात आले. येथील शिवस्मारक सभागृहात पार पडलेल्या सोहळ्यास जिल्ह्यातील विविध शासकीय, निमशासकीय कार्यालयातील बहुसंख्य अधिकारी कर्मचाऱ्याची तसेच पुरस्कार प्राप्त यांचे परिवारासह रसिक श्रोते उपस्थितीत होते.
कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषद जुळे सोलापूरचे विद्यमान अध्यक्ष पद्माकर कुलकर्णी उपस्थित होते. ज्येष्ठ साहित्यिका डॉ. नसीम पठाण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या.
राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कार मानकरी प्रा. विवेक चंदालिया, प्रफुल्ल सोनवणे, राहुल बाबरे यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
संयोजक आशुतोष नाटकर यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना सभागृह पुढे ठेवले. यानंतर एकूण १६ उत्तम अभियंताना पुरस्कार प्रदान करण्यात आले. मानपत्र ,शाल, पुष्पगुच्छ संविधानांची प्रत असं पुरस्काराचे स्वरूप होते .व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार सोहळा पार पडला.
यावेळी असिफ चांदसो मुलाणी, किरण अर्जुन गायकवाड, सुरेश भालचिम, व्यासपीठावर उपस्थित होते. शितल बिराजदार, पी. एस. कांबळे निवृत्त अभियंता यांनी पुरस्काराप्रती आपले मत व्यक्त केले . प्रा. डॉ. नसीम पठाण यांनी आपले विचार अध्यक्ष या नात्याने सभागृहापुढं पुढे ठेवले.
या कार्यक्रमाचे नेटकेपणाने व खुमासदार शैलीत प्रा. भैरवनाथ कानडे यांनी सूत्रसंचालन केले. ज्येष्ठ कवी मारुती कटकधोंड यानी उपस्थित मान्यवरांच्या आग्रहास्तव त्यांनी खुमासदार शैलीत आपली कविता सादर करुन सभागृहाला खिळवून ठेवत नंतर त्यांनी आभार प्रदर्शन केले.
