आरोग्य उपसंचालक डॉ.भगवान पवार व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा डोईफोडे यांचा रासकम. संघटनेच्या वतीने सत्कार

shivrajya patra

सोलापूर : शासनाच्या आरोग्य खात्याचे पुणे विभागीय संचालक डॉ. भगवान पवार तसेच  जिल्हा शल्य चिकित्सक श्रीमती डॉ. वर्षा डोईफोडे यांचा गुरुनानक चौकातील रुग्णालयात,रविवारी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, जिल्हा शाखा सोलापूर यांच्या वतीने बाळकृष्ण पुतळे यांच्या नेतृत्वाखाली तसेच सार्वजनिक आरोग्य कर्मचारी संघटनेचे समीर हुडेवाले आणि कोषाध्यक्ष हुसेनबाशा मुजावर, सोलापूर जिल्हा शाखेच अध्यक्ष विजयकुमार भांगे, जिल्हा सरचिटणीस  राजा सोनकांबळे यांच्या हस्ते डॉ.भगवान पवार यांना शाल, श्रीफळ व पुष्पगुछ देऊन सत्कार करण्यात आला.                             

त्यानंतर जिल्हा शल्य रुग्णालयाच्या जिल्हा शल्य चिकित्सक श्रीमती डॉ. वर्षा डोईफोडे यांनी जिल्हा शल्य चिकित्सक या पदाचा नुकताच पदभार स्विकारून रुजू झाल्याबद्दल जिल्हा शाखेचे बाळकृष्ण पुतळे, जिल्हा कोषाध्यक्ष हुसेनबाशा मुजावर, जिल्हा उपाध्यक्ष सटवाजी होटकर, आणि समीर हुडेवाले यांच्या हस्ते त्यांच्या कार्यालयात सदिच्छा भेट घेऊन श्रीमती डॉ. वर्षा डोईफोडे यांनाही शॉल, श्रीफळ व पुष्पगुछ देऊन सत्कार करण्यात आला.                 

 डॉ. भगवान पवार हे शासकीय कामाकरिता पुण्याहून एक दिवसीय सोलापूर दौऱ्यावर आले होते. यावेळी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांनी डॉ. भगवान पवार यांची जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयात सदिच्छा भेट घेतली. यावेळी रुग्णालयात आणि प्रशासनामध्ये विविध पदावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या अडी-अडचणी आणि प्रश्नांवर चर्चा केली. 

यावेळी डॉ. पवार यांनी जिल्हा पदाधिकाऱ्यांना त्यांच्या अधीपत्त्याखाली असलेल्या शहरी तसेच ग्रामीण रुग्णालयामध्ये व प्रशासनातील कर्मचाऱ्यावर कसलाही अन्याय न करता त्यांना प्रशासनाच्या माध्यमातून योग्य ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.             

यानंतर राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या सोलापूर," जिल्हा शाखेचे प्रमुख पदाधिकारी तसेच राज्य सरकारी (चतुर्थश्रेणी) कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या आरोग्य खात्याचे अध्यक्ष प्रभाकर होनकळस यांच्यासह सोलापूर शहर जिल्ह्यातील सर्व खातेनिहाय संघटनांचे प्रमुख पदाधिकारी व सभासद यांच्यावतीने सत्कार केला.

यावेळी जिल्हा सरचिटणीस राजा सोनकांबळे यांनी डॉ. भगवान पवार यांचं सोलापूर शहरात प्रथमतःच आगमन झाल्याप्रित्यर्थ संघटनेच्या वतीने त्यांचे विशेष स्वागत करून पुढील प्रशासकीय वाटचालीस शुभेच्छा देण्यात दिल्या.                            

यावेळी सोलापूर आयटीआय निदेशक संघटनेचे  जिल्हा अध्यक्ष बाळकृष्ण पुतळे, विभागीय सहसंचालक (उच्च शिक्षण) सोलापूर विभागाचे विभागीय अध्यक्ष राजा सोनकांबळे, सोलापूर जिल्हा मलेरिया विभागाचे माजी अध्यक्ष सी. एस. स्वामी व समीर हुडेवाले, सोलापूर जिल्हा वाहन चालक कर्मचारी संघटनेचे तसेच लिपिक संघटनेचे अध्यक्ष व जिल्हा कोषाध्यक्ष हुसेनबाशा मुजावर, जिल्हा कृषि अधिकारी/कर्मचारी संघटनेचे आर. जे. शिंदे, आयटीआय. कर्मचारी संघटनेचे संतोष गडगडे, जिल्हा भुजल व सर्व्हेक्षण कर्मचारी संघटनेचे सहसचिव शशिकांत भालेराव, जिल्हा कोषागार कर्मचारी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष भिमराव लोखंडे, आयटीआय (चतुर्थश्रेणी) कर्मचारी संघटनेचे जिल्हा सरचिटणीस सटवाजी होटकर, जिल्हा मलेरिया विभाग संघटनेचे सरचिटणीस प्रविण वाघमारे, त्यांचे सहकारी पदाधिकारी गणेश कांबळे, दयानंद पवार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कर्मचारी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रभाकर माने, तसेच सुनिल बोलबत्तीन, सार्वजनिक पाटबंधारे विभाग (चतुर्थश्रेणी) कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अशुतोष नाटकर, सार्वजनिक आरोग्य विभाग कर्मचारी संघटनेचे अन्य पदाधिकारी व सभासद ,सिंचन भवन (चतुर्थश्रेणी) कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत चलवादी, जिल्हा माहिती अधिकारी कार्यालय (चतुर्थश्रेणी ) कर्मचारी संघटनेचे माजी अध्यक्ष रघुनाथ बनसोडे यांच्यासह राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना शहर-जिल्हा शाखेचे पदाधिकारी, सदस्य तसेच  सर्व खातेनिहाय संघटनांचे प्रमुख पदाधिकारी, सभासद आदी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होते.

To Top