'सेडा' च्या अध्यक्षपदी डॉ. सुरजरतन धूत तर सचिवपदी हरीश कुकरेजा

shivrajya patra

सोलापूर : साेलापूर इलेक्ट्राॅनिक्स डिलर्स असाेसिएशन (सेडा) या इलेक्ट्राॅनिक्स्, हाेम अप्लायन्सेस, काॅम्प्युटर्स, सोलर उत्पादने, हेल्थ इक्विपमेंट्स व टेली कम्युनिकेशन्स् डिलर्स संस्थेच्या 2025-27 कालावधीसाठी अध्यक्षपदी डॉ. सुरजरतन धूत तर सचिवपदी  हरीश कुकरेजा यांची निवड करण्यात आली. 

नुकत्याच झालेल्या संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ही घाेषणा करण्यात आली. सेडाच्या उपाध्यक्षपदी भूषणकुमार भुतडा, खजिनदारपदी सुयोग कालाणी , सहसचिवपदी गिरीश मुंदडा तर अन्य पदाधिकाऱ्यांमध्ये बसवराज नवले, रवींद्र पाचलाग, चंद्रकांत शाहापूरे, विजय टेके, सचिन करवा आणि सुनील भांजे यांची वर्णी आहे. मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून माजी अध्यक्ष जितेंद्र राठी, दीपक मुनोत व शिवप्रकाश चव्हाण यांनी काम पाहिले. त्यांनी संस्थेची निवडणूक अविरोध झाल्याची घोषणा केली.  

नूतन अध्यक्ष डॉ. सुरजरतन धूत यांनी आपले अध्यक्षीय भाषणात, सर्व सभासदांना साेबत घेऊन सर्वांच्या उत्कर्षासाठी अनेकविध उपक्रम आगामी वर्षात सेडा तर्फे राबविले जातील. सभासदांच्या स्टाफसाठी वैद्यकिय व शैक्षणिक मदत याेजनांना बळकटी देणे यावर कटाक्ष असेल. सेडाचा महत्वाचा उपक्रम म्हणजे प्रतिवर्षी हाेणारे इलेक्ट्राे हे प्रदर्शन... ! ते प्रदर्शन निटनेटके, स्वच्छ, सुंदर व सभासदांच्या सहविचाराने भरविले जाईल. 

सेडाचे पूर्व पदाधिकारी व नवीन सभासद यांची सांगड घालून संस्थेस एका वेगळ्या उंचीवर पाेहचविण्याचा मानस आहे. विविध सामाजिक  व व्यावसायिक संस्थांसोबत विविध उपक्रम  घेण्याचाही मानस त्यांनी ह्याप्रसंगी व्यक्त केला. ह्यामध्ये सभासदांनी ही आपले योगदान द्यावं, असं आवाहन त्यांनी यांनी यावेळी केले.

कोणत्याही वयात सदैव नाविन्य टेक्नॉलॉजी शिकण्यास व समजण्यास अपडेटेड राहण्यासाठी तंत्रज्ञान, विज्ञान विषयक सेमिनार-किंवा सहली चे नियोजन सभासदांसाठी व त्यांच्या पाल्यांसाठी घेऊ, असं त्यांनी जाहीर केले. संस्थेच्या प्रगतीसाठी  नाविन्यता यावी, सभासद व त्यांची युवा पिढी यांची एक सेडा क्रिएटिव्ह युवा समिती स्थापन करण्याचाही मानस त्यांनी जाहीर केला. 

व्यवसायवाढीसाठी लागणारी आधुनिक तंत्रज्ञानाविषयी माहिती, व्यवसायातील प्रश्न, आव्हाने किंवा समस्या या विषयी कोणत्याही शासनाच्या अनुदानित योजनेची माहिती सभासदांपर्यंत पोहचविण्याचा विशेष प्रयत्न असणार आहे. एकत्र येणे, प्रगती साधणे, उद्योग नाविन्यता स्विकारणे उभारणे हे मुख्य विषय राहिल. पुढील वाटचालीस सभासदांचे सहकार्य हे महत्त्वाचे व मोलाचे राहील, असे त्यांनी सांगितले.  

मावळते अध्यक्ष आनंद येमुल यांनी आपल्या कारकिर्दीचा आढावा घेत सर्वांनी दिलेल्या सहकार्यबद्दल आभार व्यक्त केला. ह्याप्रसंगी केतन शहा, दिलीप राऊत, आनंदराज दोशी, सतीश मालू, जितेंद्र राठी, दीपक मुनोत, शिवप्रकाश चव्हाण, समीर गांधी, खुशाल देढिया, कौशिक शाह, बिपीन कुलकर्णी, ईश्वर मालू, आनंद येमुल ह्या सर्व माजी अध्यक्षांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी नवीन सभासदांचे स्वागत करण्यात आले.

कार्यक्रमाचं सूत्रसंचालन भूषण भुतडा यांनी केले. सचिव हरीश कुकरेजा यांनी पुढील इलेक्ट्राे प्रदर्शनासाठी सभेची परवानगी घेतली तर खजिनदार सुयोग कालाणी यांनी आभार प्रदर्शन केले. 

To Top