04 ऑक्टोबरला बहुजन मुक्ती पार्टीचे 03 रे राष्ट्रीय अधिवेशन

shivrajya patra

SC/ST/OBC आणि अल्पसंख्याकांना मतदान यादीतून वगळणे आणि सत्ताधाऱ्यांच्या षड्:यंत्रकारी चालीवर चर्चा

सोलापूर : बहुजन मुक्ती पार्टीचे 03 रे राष्ट्रीय अधिवेशन शनिवारी, 04 ऑक्टोबर रोजी दुपारी 03 वा. ते रात्री 10 वा. दरम्यान मुंबईत चेंबूर तिलक नगरातील लोकमान्य तिलक क्रीडांगणावर आयोजित करण्यात आलं आहे. या अधिवेशनाचे उद्घाटन शिवसेना (उद्धव ठाकरे) चे माजी आमदार बाबुराव माने यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती बहुजन मुक्ती पार्टी (युवा संघटन) प्रदेश प्रवक्ता ॲड. योगेश शिदगणे यांनी दिली.

या अधिवेशनास बहुजन मुक्ती पार्टी राष्ट्रीय प्रभारी प्रवेंद्प्रताप सिंह (नवी दिल्ली), राष्ट्रीय अध्यक्ष दासराम नायक (नवी दिल्ली), बहुजन मुक्ती पार्टी (युवा संघटन) राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.अनिल माने (नवी दिल्ली), राष्ट्रीय अध्यक्ष चौधरी विकास पटेल (रा.प.व.म नवी दिल्ली), राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.मगन ससाणे (इं.मे.प्रो.अ नवी दिल्ली) आणि राष्ट्रीय अध्यक्ष इं.सय्यद मकसूद (रा.मु.मो नवी दिल्ली) मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रीय संयोजक वामन मेश्राम (राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा, नवी दिल्ली) या अधिवेशनाचे मुख्य मार्गदर्शक असतील.

01) मतदानाचा अधिकार हा शासक बनण्याचा आणि शासक बनवण्याचा अधिकार आहे, परंतु असंवैधानिक इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राद्वारे (EVM) मतदानाचा अधिकार रद्द करणे आणि SRI (सुधारणा) द्वारे SC/ST/OBC आणि अल्पसंख्याकांना मतदान यादीतून वगळणे हे शासक जातींचे षड्यंत्र आहे - एक गंभीर चर्चा!

02) ओबीसींची जात-आधारित जनगणना न करणे, मंडल आयोग आणि सच्चर आयोग लागू न करणे, हिंदू आणि मुस्लिमांच्या नावाखाली आपापसात संघर्ष निर्माण करणे, ही सत्ताधारी वर्गाची षड्:यंत्रकारी चाल आहे-एक चर्चा... ! या महत्त्वपूर्ण विषयावर अधिवेशनात चर्चा होणार आहे.

ह्या विषयावर चर्चा करण्यासाठी व चर्चेतून मार्ग काढण्यासाठी हे विशाल राष्ट्रीय अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. 

या अधिवेशनास देशभरातून हजारोंच्या संख्येने पदाधिकारी-कार्यकर्ते, शुभचिंतक व हितचिंतक उपस्थित राहणार आहेत. या अधिवेशनासाठी सोलापूर जिल्ह्यातूनही बहुजन मुक्ती पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने मुंबई येथे जाणार असल्याचे प्रदेश प्रवक्ता ॲड. शिदगणे यांनी सांगितलं आहे.


To Top