मोहोळ/विष्णु शिंदे : गुलमोहरचा राजा गणेश उत्सव मंडळाच्या वतीने यावर्षी विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्या अंतर्गत, 'टुडे न्यूज महाराष्ट्र' चॅनलच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिरात परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आणि मोठ्या संख्येने रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. समाजात रक्ताची गरज भासल्यावर कोणाचाही जीव वाचवण्यासाठी हे रक्तदान उपयुक्त ठरणार आहे.
याप्रसंगी मंडळाचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक मान्यवर उपस्थित होते. आयोजकांनी रक्तदात्यांचे मनःपूर्वक आभार मानले, अन् पुढील काळात असेच समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचे आश्वासन दिले.
'टुडे न्यूज महाराष्ट्र' चॅनलतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करून सामाजिक जबाबदारीची जाणीव करून देण्यात आली आहे.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष शाहिद पटेल, उपाध्यक्ष समजिक कारंडे, खजिनदार सागर पिटले, कायदेशीर सल्लागार मनोज गावडे, प्रसिद्धी प्रमुख भैय्या कांबळे, मार्गदर्शक हसन शेख, अरबाज इनामदार, किरण पिटले, साहिल गोरे, महादेव जिरगे, तेजस बागणीकर, युवराज कांबळे, इक्बाल मुजावर, विष्णू कदम, भैरवनाथ पवार, शोएब इनामदार त्याचबरोबर नंदा गोरे, पूनम जिरगे, वैशाली कदम आदी महिलांचा सहभाग होता.
