श्री वीर गणपती ट्रस्ट व उत्सव समितीतर्फे “वात्सल्य-रोटरी हुमन मिल्क बँकेला एक लाख रुपयांची देणगी

shivrajya patra

सोलापूर : श्री वीर गणपती ट्रस्ट व उत्सव समिती 2025 तर्फे “वात्सल्य-रोटरी हुमन मिल्क बँक यांना एक लाख रुपयांची देणगी देण्यात आली. उत्सवात अनावश्यक खर्चाला फाटा देत, श्री वीर गणपती ट्रस्ट व उत्सव समिती 2025 चा हा दातृत्वाचा सामाजिक उपक्रमाचं सर्वोत्तम उदाहरण पाहिलं जात आहे.

या कार्यक्रमात प्रारंभी पीपी पटेल फाउंडेशनचे अध्यक्ष जयेशभाई पटेल, विवेकानंद रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ. विजय देऊळगावकर, मनोदय रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ. निहार बुरटे, नौदल रुग्णालय चे चेअरमन डॉ. मिलिंद शहा, अग्रवाल राईस मार्चंटचे मालक राईस किंग दिनेश अग्रवाल यांच्यासह अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत श्री वीर महागणपतीची महाआरती व महापूजा करण्यात आली. तदनंतर या सामाजिक कार्याच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. 

याप्रसंगी रोटरी भैरूरतन दमाणी अंध शाळा, दमाणी नगर, सोलापूर चे सचिव संतोष भंडारी, एमआयटी सोलापूर सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. वंदना कोपकर, अध्यक्ष-इलेक्ट, रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थ (2026-27) अध्यक्ष आसावरी सराफ, रोटरी क्लब ऑफ सोलापूर उत्तर सांस्कृतिक संचालक डॉ. मधुरा बुरटे, ॲड. स्वप्नील कोंडगुळे यांचीही प्रमुख उपस्थिती होती. 

सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत हा उपक्रम यशस्वीरित्या पार पडला. श्री वीर गणपती ट्रस्टचे विश्वस्त व उत्सव समितीचे पदाधिकारीही मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 


To Top