सोलापूर : समाजात बंधुभाव वृद्धिंगत होण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी एकत्र आलं पाहिजे. जश्न-ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त तिरंगा ग्रुपच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी अनावश्यक खर्चाला फाटा देत समाजातील गरजवंत घटकाला मदत करताना सर्वांना एकत्र आणण्याचं केलेलं कार्य कौतुकास्पद आहे, असं प्रतिपादन छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेडचे शहराध्यक्ष हाजी मतीन बागवान यांनी केले.
उत्तर सोलापूर तालुक्यातील मौजे तळे हिप्परगा, फूट रस्ता येथील तिरंगा ग्रुपच्या वतीने प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर जयंती अर्थात जश्न-ईद-ए-मिलादुन्नबी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. ईदच्या निमित्ताने तिरंगा ग्रुपने सोमवारी, सायंकाळी डीजे-डॉल्बीसाठी होणाऱ्या अनावश्यक खर्च फाटा देत, गरजू महिलांसाठी साडी वाटप आणि सर्वांसाठी स्नेहभोजनाचं आयोजन केलं होतं. 
याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेडचे शहराध्यक्ष हाजी मतीन बागवान, मराठा सेवा संघाचे शिवश्री राम गायकवाड, यासर सैय्यद, मयूर माने, पत्रकार इक्बाल शेख, आणि नागनाथ महामुनी यांची प्रमुख उपस्थिती होती. 
प्रारंभी ग्रुपच्या वतीने शॉल-गुलाब पुष्प देऊन करण्यात आलं. यावेळी हाजी मतीन बागवान बोलत होते.
प्रेषितांनी शांती, सामाजिक सलोखा अन् , 'आहे रे' वर्गाने 'नाही रे' वर्गाला मदत करण्याचा संदेश दिला. त्याचा अनुनय इथले पदाधिकारी-कार्यकर्ते करीत आहेत. येत्या काळात सर्व समाज घटकांनी माणूस आणि मानवतेसाठी एकत्र येण्याची गरजही हाजी मतीन बागवान यांनी यावेळी अधोरेखित केली.
हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी अमीर नाटीकर, राकेश राठोड, शंकर वाघमारे, हुसेन बलोरगी, राहुल सिदू, हुसेन निझाम, शिवश्री गोवर्धन गुंड, सुनंदा साठे, रुकसान कमानवले, महबूबबी नाटेकर, आबेदा बलोरगी यांनी परिश्रम घेतले.
