‘१२० बहादुर’ टीमची रिझांग ला युद्धातील खऱ्या शूरवीरांशी भेट, पाहा खास क्षणांचे फोटो
फरहान अख्तर अभिनीत वॉर-ड्रामा चित्रपट ‘१२० बहादुर’ हा भारतीय सैन्याच्या इतिहासातील एक अत्यंत शौर्यपूर्ण पण तुलनेने कमी प्रसिद्ध असलेल्या लढाईवर - ‘रिझांग ला’ च्या युद्धावर आधारित आहे. १९६२ मध्ये कडाक्याच्या थंडीमध्ये झालेल्या भारत-चीन युद्धाच्या पार्श्वभूमीवर आधारित ही फिल्म खरी वीरता दर्शवते, जिथे १३ कुमाऊं रेजिमेंटचे १२० भारतीय सैनिक अनेक पटीने जास्त चिनी सैनिकांविरुद्ध अखेरच्या श्वासापर्यंत लढले होते.
ही फिल्म त्या शूर सैनिकांना समर्पित आहे, ज्यांनी आपल्या देशासाठी प्राणाची आहुती दिली. अलीकडेच, ‘१२० बहादुर’ टीमसाठी एक भावनिक क्षण आला जेव्हा त्यांना रिझांग ला लढाईचे खरे नायक – सूबेदार ऑनरेरी कॅप्टन राम चंदर यादव आणि हवालदार निहाल सिंग यांच्याशी भेटण्याची संधी मिळाली, जे आजही आपल्यात हयात आहेत.
दिल्लीमध्ये, चित्रपटाचे निर्माते रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर, दिग्दर्शक रझनीश "रेझी" घई, यांना या खर्या जीवनातील हिरोंशी आणि त्यांच्या कुटुंबीयांशी भेटण्याची संधी मिळाली. या विशेष क्षणाला अजून खास बनवताना, फिल्ममध्ये राम चंदर यादव आणि निहाल सिंग यांची भूमिका साकारणारे कलाकार स्पर्श वालिया आणि अतुल सिंग यांनी देखील आपल्या जीवनातील प्रेरणास्थानांशी प्रत्यक्ष भेट घेतली.
फरहान अख्तर यांनी या भेटीचे फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले-
"रिझांग ला लढाईचे दोन हयात शूरवीर- सूभेदार ऑनरेरी कॅप्टन राम चंदर यादव जी आणि हवालदार निहाल सिंग जी यांच्यासोबत काही वेळ घालवणं, ही माझ्यासाठी खूप मोठा सन्मान होता. @SparshWaliaa आणि @AtulSingh4199 यांना त्यांच्या प्रत्यक्ष आयुष्याच्या प्रेरणास्थानांशी भेट घडवून देणं देखील एक खास अनुभव होता. आम्ही त्यांच्या खऱ्या कथेवर आधारित ही फिल्म साकारू शकलो, यासाठी आम्ही पुन्हा एकदा त्यांचे आभार मानतो.
‘१२० बहादुर’ ही खरी शौर्यगाथा आहे – १२० जवानांनी १९६२ मध्ये *रिझांग ला*च्या लढाईत शत्रूंपुढे हार न मानता देशाच्या सीमांचे रक्षण केले. त्यामुळे ही लढाई भारतीय सैन्य इतिहासातील सर्वात शूर आणि निर्णायक युद्धांपैकी एक ठरली. संपूर्ण चित्रपटामध्ये एक ठाम संदेश उमटतो-
"आम्ही मागे हटणार नाही."
दिग्दर्शक रझनीश “रेझी” घई यांच्या मार्गदर्शनाखाली, रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर (एक्सेल एंटरटेनमेंट) व अमित चंद्रा (ट्रिगर हॅप्पी स्टुडिओज) यांनी निर्मित केलेली ही फिल्म, एक्सेल एंटरटेनमेंटचे प्रॉडक्शन आहे. हा चित्रपट २१ नोव्हेंबर २०२५ रोजी देशभरातील सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
🔗 [Instagram पोस्ट बघा](https://www.instagram.com/p/DOV5W46AqZi/?igsh=MTVzNjE5dXkyeHE2aw==)
