7, 000 कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप करीत कांबळे यांच्या आझाद मैदानावरील आमरण उपोषणास प्रारंभ

shivrajya patra

सोलापूर शहराला भ्रष्टपूर असं नाव देण्यात यावे; मुख्यमंत्र्यांकडं मागणी

मुंबई : सोलापूर महापालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओंबासे, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, नगर अभियंता सारिका आकुलवार यांच्यासह अन्य अधिकारी व ठेकेदारांवर आर बी दयावान संस्थेचे सचिव विश्वभूषण कांबळे यांचा 7, 000 कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप आहे. या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन शासनाने दोषींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी, विश्वभूषण कांबळे यांनी येथील आझाद मैदानावर सोमवारी, 08 सप्टेंबरपासून आमरण उपोषणास प्रारंभ केला. सोलापूर शहराला भ्रष्टपूर असं नाव देण्यात यावे, अशी मागणी संस्थेचे सचिव कांबळे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केलीय.

सोलापूर महानगरपालिका हद्दीतील 01 ते 26 प्रभागांमध्ये अंदाजे जवळपास 7, 000 कोटी रुपयांचे काम झाले व बोगस बिले करण्यात आलेले आहेत, परंतु जागेवर जाऊन काम पाहिले असता, काम झालेले नाही. निष्कृष्ट दर्जेचे काम करून मोठ्या प्रमाणात कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार या ठिकाणी झालेला आहे. 100 ठेकेदार व अधिकारी यांनी हात मिळवणी करून कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याची दयावान संस्थेची तक्रार आहे.

आर बी दयावान सामाजिक संस्थेचे विश्वभूषण कांबळे, गेले तीन वर्ष या भ्रष्ट कारभाराचा पाठपुरावा करीत आहेत. सोलापुरातील आंदोलनाची शासनाने दखल न घेतल्याने कांबळे यांनी आपल्या आंदोलनाची व्याप्ती वाढवत आमरण उपोषणास प्रारंभ केला आहे. 

या भ्रष्टाचाराच्या मालिकेत उप अभियंता अविनाश वाघमारे, उप अभियंता किशोर सातपुते, सहाय्यक अभियंता प्रकाश दिवाणजी, सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चोबे, तत्कालीन पाणीपुरवठा उपअभियंता तपन डंके, व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता, एम. बी. मुळे-पाटील, कार्यकारी अभियंता मनोज ठाकरे, उप अभियंता श्रीकांत गायकवाड, शाखा अभियंता विशाल लेंगरे, यांनाही निलंबित करण्यात यावं, हे आमरण उपोषण सुरू करण्यात आलं आहे.

या सर्व अधिकारी व ठेकेदार यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करून शासनाचे फसवणूक व नागरिकांची फसवणूक केल्याप्रकरणी कायदेशीर कारवाई करण्यात यावी. नागरिकांची व शासनाचे पैसे परत वसूल करून घेण्यात यावेत, या मागणीसाठी आर बी दयावान संस्थेची मागणी आहे.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष विश्वरत्न कांबळे, लक्ष्मण सरवदे, वैभव शिंदे आदी पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित असल्याचं सांगण्यात आलंय.

To Top