सोलापूर : महाराष्ट्र शासन शिक्षण विभाग निर्णयानुसार अनुदान टप्पा वाढीसाठी प्रस्ताव 08 ते 12 सप्टेंबरपर्यंत सोलापूर जि. प. शिक्षण विभागाने मागवून घेतले होते. राज्यातील अन्य जि. प. शिक्षण अधिकारी यांनी टप्पा वाढीचे आदेश दिले आहेत. 
सोलापूर जिल्हा परिषद पाठीमागे आहे. टप्पा वाढीचे आदेश बुधवारी मिळावेत, या मागणीसाठी शिक्षक माजी आमदार दत्तात्रय सावंत यांनी शेकडो शिक्षक व कर्मचारी यांचेसह जि. प. आवारात ठिय्या मांडला.
त्यांचेसमवेत बहुजन शिक्षक महासंघाचे प्रदेश अध्यक्ष समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर, प्राचार्य सुभाष माने, शाळा कृती समितीचे जिल्हा अध्यक्ष गुरुनाथ वांगीकर, विकास शिंदे, बहुजन महासंघाचे राज्य सरचिटणीस प्राचार्य बोधिप्रकाश गायकवाड, जिल्हा अध्यक्ष प्रा. युवराज भोसले, जिल्हा सरचिटणीस रवी देवकर, 
दक्षिण सोलापूर अध्यक्ष दत्तात्रय शिंदे, उत्तर सोलापूर अध्यक्ष नितीन गायकवाड, सर्फराज बलोलखान, युसूफअली पटेल, बाळे पतसंस्था माजी चेअरमन राजेंद्र माळी, महेश रेळेकर (मुख्याध्यापक), विठ्ठल मोरे, मुख्याध्यापक सत्यवान पाचकूडवे, पांडुरंग दराने, प्रविण पाटील, मुख्याध्यापक गाढवे, इनूस बाळगी इत्यादी उपस्थित होते.
