माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा वाढदिवस; बुधवारी मोफत सर्वरोग निदान शिबीर

shivrajya patra

सोलापूर : माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवारी, 03 सप्टेंबर रोजी येथील चंद्रभागाबाई यलगुलवार प्रशाला व ज्युनिअर कॉलेज यांच्या वतीने परिसरातील नागरिकांसाठी मोफत सर्वरोग निदान शिबिर आयोजित करण्यात आलं आहे.

होटगी रोडवरील विकास नगरातील रत्नदीप हाउसिंग सोसायटी शेजारील चंद्रभागाबाई यलगुलवार प्रशाला व ज्युनिअर कॉलेजमध्ये या सर्वरोग निदान शिबीरास सकाळी 10:30 वाजता प्रारंभ होणार आहे.

या शिबिरात 🔹 रक्त तपासणी (CBC),🔹 रक्तदाब (ब्लडप्रेशर) तपासणी,🔹 मधुमेह (शुगर) तपासणी आणि🔹 नेत्र तपासणी या मोफत तपासण्या करण्यात येणार असून मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार असल्यांचं संयोजकानी सांगितलं आहे.

या उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी परिसरातील सर्व नागरिकांनी आवर्जून उपस्थित राहावं, असं आवाहन प्राचार्या सीमा श्रीगोंदेकर-यलगुलवार यांनी केलं आहे.

To Top