सोलापूर : येथील सेवासदन शाळेच्या माजी मुख्याध्यापक सौ. मंगला वसंतराव यादव यांचं गुरुवारी सकाळी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी संध्याकाळी मोदी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्या 73 वर्षांच्या होत्या.
त्यांच्या पश्चात पती, दोन मुली, मुलगा, सुन, नातवंडे असा परिवार आहे . सोलापुरातील प्रतिथयश बांधकाम व्यावसायिक निलेश यादव यांच्या त्या मातोश्री होत.
