सोलापूर : जिल्ह्यातील 320 शाळांना अनुदानाचा पुढील टप्पा वाढ आदेश मिळण्यासाठी पुणे विभागाचे माजी शिक्षक आ. दत्तात्रय सावंत, बहुजन शिक्षक महासंघाचे प्रदेश अध्यक्ष समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी, 24 रोजी दिवसभर ठिय्या मारून पाठपुरावा केला. दिवसभराच्या पाठपुराव्यानंतर रात्री 9:00 वा. माध्यमिक विभागाचे शिक्षण अधिकारी सचिन जगताप यांनी प्रतिनिधिक स्वरूपात दोन आदेश वितरित केले. त्यामुळं राज्य शाळा कृती समिती आणि बहुजन शिक्षक महासंघाच्या पाठपुराव्याला यश आलं आहे.
महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार राज्यातील अंशतः अनुदानित शाळांना अनुदानाचा पुढील टप्पा मंजूर करण्यासाठी जिल्हा परिषद सोलापूरच्या शिक्षण विभागाने 08 ते 12 सप्टेंबर पर्यंत प्रस्ताव मागवले होते. मागविलेल्या प्रस्तावनुसार जिल्ह्यातील 320 वीस शाळांनी मुदतीमध्ये प्रस्ताव सादर केले होते.
यावेळी बहुजन शिक्षक महासंघाचे राज्य सरचिटणीस प्राचार्य बोधीप्रकाश गायकवाड, कृती समितीचे जिल्हाध्यक्ष गुरुनाथ वांगीकर, जिल्हा सचिव विकास शिंदे, सरफराज बलोलखान, बहुजन शिक्षक महासंघाचे जिल्हा सरचिटणीस रवी देवकर, उत्तर सोलापूर अध्यक्ष मुख्याध्यापक नितीन गायकवाड, दक्षिण सोलापूरचे अध्यक्ष दत्तात्रय शिंदे, जिल्हा संघटक सिद्धेश्वर भुरले, शहर प्रमुख इंनूस बाळगी, निर्मला मौळे इत्यादींसह उपस्थितीत असंख्य शिक्षक-कर्मचारी उपस्थित होते. 
शेवटी राज्य शाळा कृती समितीचे जिल्हाध्यक्ष गुरुनाथ वांगीकर यांनी शिक्षण विभागातील सर्व अधिकाऱ्यांचे आभार मानले. शिक्षण अधिकारी सचिन जगताप यांच्या कार्यतत्परतेबद्दल जिल्ह्यातील शेकडो शाळेतील शिक्षक व कर्मचारी यांनी त्यांचं आभार मानले.

