'पुष्परत्न' संस्थेच्या वतीने रविवारी क्रांतिसूर्य व क्रांतिज्योती शिक्षक प्रेरणा पुरस्कारानं 105 जणांचा सन्मान

shivrajya patra

(धामोरी / दत्तात्रय घुले) : राज्यातील शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय आणि दैदिप्यमान कार्य केलेले 105 शिक्षक, संस्था चालक आणि मुख्याध्यापकांना क्रांतिसूर्य व क्रांतिज्योती शिक्षक प्रेरणा पुरस्कारानं सन्मानित करण्यात येतंय, हा सन्मान सोहळा रविवारी, 28 सप्टेंबर रोजी नाशिक येथील परशुराम सायखेडकर सभागृहात आयोजित करण्यात आला असल्याची माहिती पुष्परत्न बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष व आहिरे स्पर्धा परीक्षा ॲकॅडमीचे संचालक प्रा. डॉ. आनंद आहिरे यांनी दिली.

कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून म्हणून राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ (विशेष सहाय्य मंत्री) उपस्थित राहणार असून प्रमुख पाहुणे म्हणून सोमनाथ भिसे (माजी उपसभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, सिन्नर), ओमकार पवार (मुख्य कार्यकारी अधिकारी- नाशिक जिल्हा परिषद), दै.पुण्यनगरीचे संपादक किरण लोखंडे, दत्तात्रय कराळे(आय.जी, नाशिक परिक्षेत्र ), डाॅ.संजीव सोनवणे (कुलगुरु-यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक), संजयकुमार राठोड (नाशिक शिक्षण उपसंचालक) आणि देविदास नांदगावकर (सहायक आयुक्त समाजकल्याण, नाशिक) आदी मान्यवरांची या सन्मान सोहळ्याला उपस्थिती राहणार आहे. नितीन ठाकरे (सरचिटणीस,म. वि. प्र. स.नाशिक) कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील, असं सांगण्यात आलंय.

पुष्परत्न बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून 2016 सालापासून आजतागायत साहित्यक्षेत्रात 51 च्या वरती विनामूल्य राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्टीय कवीसंमेलन, साहित्यसंमेलन, पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. शैक्षणिक क्षेत्रात आहिरे स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या माध्यमातून 16 हजाराहून अधिक विद्यार्थी शिकून गेले आहेत.त्यात 1, 617 विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. 

संपूर्ण महाराष्ट्रातील  96, 000 च्या वरती विद्यार्थ्यांना विनामूल्य स्पर्धा परीक्षाचे मार्गदर्शन करण्यात आले आहे. गुणवंत व उत्तीर्ण विद्यार्थी सन्मान सोहळा साजरा केला जातो. त्याचबरोबर सामाजिक क्षेत्रात दरवर्षी जागतिक महिला दिन व मातृदिन सन्मान सोहळा साजरा केला जातो. अनाथ आश्रम, वृध्दाश्रम व वस्तीगृहास विविध विविध प्रकारे मदत केली जाते.

या गौरव सोहळ्यात आहिरे अकॅडमी व बीग स्कोर एज्युकेशन कंपनी या दोघांचे (Air Rankar Learning online App) चे उद्घाटन प्रमुख मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. तसेच याच दिवशी आमची संस्था-पुष्परत्न बहुउद्देशीय सेवाभावी संस्था दै.पुण्यनगरी, पुष्परत्न ब. उ. से. संस्था माझी संस्था विशेष अंकाचे प्रकाशन होणार आहे. तर प्रा. डाॅ. आनंद आहिरे यांचे स्वकथन मास्तरांना घडविणारा मास्तर या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. 

या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहावं, असं आवाहन पुष्परत्न बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष व आहिरे स्पर्धा परीक्षा अकॅडमीचे संचालक प्रा. डाॅ. आनंद आहिरे यांनी केली.

To Top