सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या 21 व्या पदवीदान समारंभात ऊर्दू कवी व लेखक तथा सोलापूर सोशल असोसिएशन उर्दू प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक आसिफ इक्बाल यांना पीएच.डी. पदवीने सन्मानित करण्यात आले. 
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात गुरुवारी पदवीदान सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्याला सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर, महाराष्ट्र राज्याचे उच्च व तांत्रिक शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. अखलाक वडवान, रिसर्च गाईड डॉ. गौसअहमद शेख, प्रभारी प्राचार्य डॉ. इ. जा. तांबोळी, मोईज शेख यांनी पीएच.डी. पदवी मिळाल्याने डॉ. आसिफ इक्बाल यांचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
